अभिमानास्पद! क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेकडून भारताच्या ५ दिग्गजांचा खास सन्मान; वाचा सविस्तर

marylebone cricket club (mcc) : मॅरीलेबोन क्रिकेट क्लबने भारताच्या ५ दिग्गजांचा खास सन्मान केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 07:36 PM2023-04-05T19:36:32+5:302023-04-05T19:37:06+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricket legends Mithali Raj, Jhulan Goswami, MS Dhoni, Yuvraj, Raina received lifetime Marylebone Cricket Club membership, know here everything  | अभिमानास्पद! क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेकडून भारताच्या ५ दिग्गजांचा खास सन्मान; वाचा सविस्तर

अभिमानास्पद! क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेकडून भारताच्या ५ दिग्गजांचा खास सन्मान; वाचा सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

lifetime Marylebone Cricket Club  । नवी दिल्ली : मॅरीलेबोन क्रिकेट क्लबने (Marylebone Cricket Club) भारताच्या ५ दिग्गजांचा खास सन्मान केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, सुरेश रैना, महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना बुधवारी प्रतिष्ठित क्लबकडून आजीवन सदस्यत्व बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे. एमसीसीने १९ शिलेदारांना या सन्मानाने गौरविले आहे. खरं तर एमसीसी हा लंडन येथील क्लब आहे, जो क्रिकेटची नियमावली तयार करत असतो. 

दरम्यान, मॅरीलेबोन क्रिकेट क्लबने क्रिकेट विश्वातील दिग्गजांना आजीवन सदस्यत्व बहाल केले आहे. या यादीत भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या देशातील खेळाडूंचा समावेश आहे. (Indian cricket legends Mithali Raj, Jhulan Goswami, MS Dhoni, Yuvraj, Raina received lifetime Marylebone Cricket Club (MCC) membership). 

सन्मानित करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे - 
मेरिसा अगुइलेरा - वेस्ट इंडीज (2008-2019, महेंद्रसिंग धोनी - भारत (2004-2019), झुलन गोस्वामी - भारत (2002-2022), जेनी गन - इंग्लंड (2004-2019), मोहम्मद हाफीज - पाकिस्तान (2003-2023) रेचेल हेन्स - ऑस्ट्रेलिया (2009-2022), लॉरा मार्श - इंग्लंड (2006-2019), इऑन मॉर्गन - इंग्लंड (2006-2022), मशरफे मोर्तझा - बांगलादेश (2001-2020), केविन पीटरसन - इंग्लंड (2005-2014), सुरेश रैना - भारत (2005-2018), मिताली राज - भारत (1999-2022), एमी सॅटरथवेट - न्यूझीलंड (2007-2022), अन्या श्रबसोल - इंग्लंड (2008-2022), युवराज सिंग - भारत (2000-2017) , डेल स्टेन - दक्षिण आफ्रिका (2004–2020), रॉस टेलर - न्यूझीलंड (2006–2022). 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Indian cricket legends Mithali Raj, Jhulan Goswami, MS Dhoni, Yuvraj, Raina received lifetime Marylebone Cricket Club membership, know here everything 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.