IPL ला प्राधान्य देऊ नका! KL Rahul सह भारतीय खेळाडूंना LSGचा मेंटॉर गौतम गंभीरचा सल्ला, म्हणाला... 

भारताचा माजी सलामीवीर व लखनौ सुपर जायंट्सचा ( LSG) मेंटॉर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) भारतीय खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगला प्राधन्य देऊ नका असा सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:19 PM2023-01-09T15:19:33+5:302023-01-09T15:20:11+5:30

whatsapp join usJoin us
'Indian cricket, not IPL, is main stakeholder': Gautam Gambhir has a strong advice for players regarding what their priorities should be given it is a World Cup year  | IPL ला प्राधान्य देऊ नका! KL Rahul सह भारतीय खेळाडूंना LSGचा मेंटॉर गौतम गंभीरचा सल्ला, म्हणाला... 

IPL ला प्राधान्य देऊ नका! KL Rahul सह भारतीय खेळाडूंना LSGचा मेंटॉर गौतम गंभीरचा सल्ला, म्हणाला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी सलामीवीर व लखनौ सुपर जायंट्सचा ( LSG) मेंटॉर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) भारतीय खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगला प्राधन्य देऊ नका असा सल्ला दिला आहे. २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. मागील दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला अपयशाचा सामना करावा लागला. टीम इंडिया फायनलमध्येही पोहोचू शकली नव्हती. स्पर्धेपूर्वी खेळाडूंना दुखापत झाली आणि टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले. आयपीएल खेळताना अनेक खेळाडूंना दुखापतही झाली आणि त्यांनी टीम इंडियाचे अनेक महत्त्वाचे सामने गमावले. हे पाहता आता गंभीरने खेळाडूंना पहिले प्राधन्य टीम इंडिया असा सल्ला दिलाय.

सूर्यकुमार यादव सर्वात मोठा विक्रम करणार, जगातला तिसरा अन् पहिला भारतीय फलंदाज ठरणार! 

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये बोलताना गंभीर म्हणाला की, ''जर एखादा मोठा खेळाडू आयपीएलला मुकतो आणि फ्रँचायझीला त्रास होतो, तर ते झाले तरी चालेल.  आयसीसी स्पर्धा असते तेव्हा तुम्ही आयपीएलला जास्त महत्त्व देऊ शकत नाही. विशेषत: जेव्हा खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात असताना. सध्या खेळाडूंसाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतीय क्रिकेट. टीम इंडियाच्या खेळाडूंनी वर्ल्ड कपला प्राधन्य द्यायला हवं, मग त्यासाठी आयपीएल हुकली तरी चालेल. कारण आयपीएल दरवर्षी येते पण वर्ल्ड कप चार वर्षांतून एकदा येतो.''

गंभीर पुढे म्हणाला की, ''जे खेळाडू तिन्ही फॉरमॅट सतत खेळतात ते ट्वेंटी-२० फॉरमॅटमधून ब्रेक घेऊ शकतात. पण त्यांनी वन डे फॉरमॅट सोडू नये. त्याने वन डे फॉरमॅट मनापासून खेळायला हवे.''

बीसीसीआयने अलीकडेच आढावा बैठकीत एक अधिसूचना काढली, की ते आयपीएलमध्ये खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापनावर लक्ष ठेवतील आणि त्याची जबाबदारी NCA म्हणजेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे असेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 'Indian cricket, not IPL, is main stakeholder': Gautam Gambhir has a strong advice for players regarding what their priorities should be given it is a World Cup year 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.