"आली रे आली, आता तुझी बारी आली", 'गब्बर' धवन 'सिंघम'च्या भूमिकेत; पाहा व्हिडीओ 

Shikhar Dhawan : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने एक मजेशीर रील्स शेअर केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 03:29 PM2023-03-21T15:29:28+5:302023-03-21T15:30:09+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricket player Shikhar Dhawanan has shared a fun reel as Singham  | "आली रे आली, आता तुझी बारी आली", 'गब्बर' धवन 'सिंघम'च्या भूमिकेत; पाहा व्हिडीओ 

"आली रे आली, आता तुझी बारी आली", 'गब्बर' धवन 'सिंघम'च्या भूमिकेत; पाहा व्हिडीओ 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shikhar Dhawan Funny Video । नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन भलेही क्रिकेटपासून दूर असला तरी तो मजेशीर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. शिखर धवन नेहमी आपल्या चाहत्यांसाठी मजेशीर रील्स शेअर करत असतो. आता त्याने एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये तो 'सिंघम'च्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिखर धवन आगामी आयपीएलच्या तयारीत व्यग्र आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात शिखर धवन पंजाब किंग्जच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. पंजाबच्या संघाला अद्याप एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळे धवनच्या नेतृत्वात पंजाबचा संघ करिश्मा दाखवणार का हे पाहण्याजोगे असेल. मात्र, पंजाबचा कर्णधार धवनने एक रील शेअर करून चाहत्यांना जागे केले आहे, ज्यामध्ये त्याने पोलिसांची वर्दी परिधान केली असून तो गुंडाची धुलाई करत आहे. त्याचा हा लूक अजय देवगणचा चित्रपट 'सिंघम'शी मिळताजुळता आहे. 

"आली रे आली, आता तुझी बारी आली"

KKR विरूद्ध पंजाबची पहिली लढत 
आयपीएल 2023 मध्ये शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जचा पहिला सामना श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. 1 एप्रिल रोजी हा सामना होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Indian cricket player Shikhar Dhawanan has shared a fun reel as Singham 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.