Join us  

"आली रे आली, आता तुझी बारी आली", 'गब्बर' धवन 'सिंघम'च्या भूमिकेत; पाहा व्हिडीओ 

Shikhar Dhawan : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने एक मजेशीर रील्स शेअर केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 3:29 PM

Open in App

Shikhar Dhawan Funny Video । नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन भलेही क्रिकेटपासून दूर असला तरी तो मजेशीर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. शिखर धवन नेहमी आपल्या चाहत्यांसाठी मजेशीर रील्स शेअर करत असतो. आता त्याने एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये तो 'सिंघम'च्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिखर धवन आगामी आयपीएलच्या तयारीत व्यग्र आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात शिखर धवन पंजाब किंग्जच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. पंजाबच्या संघाला अद्याप एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळे धवनच्या नेतृत्वात पंजाबचा संघ करिश्मा दाखवणार का हे पाहण्याजोगे असेल. मात्र, पंजाबचा कर्णधार धवनने एक रील शेअर करून चाहत्यांना जागे केले आहे, ज्यामध्ये त्याने पोलिसांची वर्दी परिधान केली असून तो गुंडाची धुलाई करत आहे. त्याचा हा लूक अजय देवगणचा चित्रपट 'सिंघम'शी मिळताजुळता आहे. 

"आली रे आली, आता तुझी बारी आली"

KKR विरूद्ध पंजाबची पहिली लढत आयपीएल 2023 मध्ये शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जचा पहिला सामना श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. 1 एप्रिल रोजी हा सामना होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :शिखर धवनआयपीएल २०२२पंजाब किंग्सभारतीय क्रिकेट संघसोशल व्हायरल
Open in App