Join us  

विराट कोहलीला 'या' व्यक्तीला भेटता न आल्याची होतेय खंत; लता मंगेशकर यांच्याबद्दल म्हणाला... 

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) सध्या विश्रांतीवर आहे... न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर विराटला ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती दिली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 5:38 PM

Open in App

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) सध्या विश्रांतीवर आहे... न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर विराटला ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती दिली गेली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तू पुनरागमन करणार आहे. विराटने त्याच्या सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने कोणत्या महिलेसोबत डिनर करायला आवडेल, या प्रश्नाचा खुलासा केला आहे. या व्हिडीओत विराटने बरीच मजेशीर प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने बेटावर एकटा वेळ घालवण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीचा खुलासा केला. 

  • प्रश्न: १६ वर्षीय विराट कोहलीला तू काय सल्ला देशील?
  • विराट कोहली: जगाला थोडे अधिक जाणून घे, मन मोकळे कर आणि दिल्लीबाहेर जीवन आहे याचा स्वीकार कर.
  • प्रश्न: तुम्हाला सर्वात जास्त आनंद देणारे ठिकाण कोणते आणि कुठे आहे?
  • विराट कोहली: मी माझ्या घरी सर्वात आनंदी आहे.
  • प्रश्न: तू आजपर्यंत खाल्लेला सर्वात विचित्र पदार्थ कोणता?
  • विराट कोहली: वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत मी सर्वात विचित्र आहार घेतला. म्हणजे मी अक्षरशः जगातील सर्व जंक फूड खाल्ले आहे. त्यामुळे तो विचित्र आहार घेणे माझ्यासाठी सामान्य होते.
  • प्रश्न: तुमचा प्लँकिंग रेकॉर्ड काय आहे?
  • विराट कोहली: मला याची माहिती नाही. तीन, साडेतीन मिनिटे? असे मला वाटते.
  • प्रश्न: कोणती ऐतिहासिक महिला व्यक्तीसोबत तुला डिनर करायला सर्वात जास्त आवडेल?
  • विराट कोहली: मला कधीच लताजींना ( Lata Mangeshkar) भेटण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल थोडे अधिक जाणून घेणे खूप छान वाटले असते.
  • प्रश्न: कुटुंबाव्यतिरिक्त, तुम्हाला बेटावर कोणासह वेळ घालवायला आवडेल?
  • विराट कोहली: कुटुंबाशिवाय... मोहम्मद अली.

 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :विराट कोहलीलता मंगेशकर
Open in App