rohit sharma and ritika sajdeh : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितची आणखीच प्रसिद्धी वाढली. मागील वर्षी भारत किताबापासून एक पाऊल दूर राहिला होता. बुधवारी रोहितचा नामांकित पुरस्काराने सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचे खेळाडू सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. १९ सप्टेंबरपासून भारत मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अलीकडेच मुंबईत CEAT Award Session चा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोहितसह टीम इंडियातील इतर काही खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली होती. बीसीसीआय सचिव जय शाह, सुनिल गावस्कर, संजय बांगर यांनीही हजेरी लावली. रोहितला पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले.
रोहित शर्मासोबत त्याची पत्नी रितीका सजदेह उपस्थित होती. या कार्यक्रमातील रितीकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यातील आहे. या व्हिडीओवरून चाहत्यांनी भलताच तर्क लावत रोहित दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे म्हटले.
रितीकाच्या व्हायरल व्हिडीओवर चाहते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा विवाह १३ डिसेंबर २०१५ रोजी झाला. त्यानंतर ३० डिसेंबर २०१८ रोजी त्यांची मुलगी समायरा हिचा जन्म झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जूनमध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. यापूर्वी भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, भारताने विश्वचषक जिंकताच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या पुढच्याच दिवशी रवींद्र जडेजानेही ट्वेंटी-२० क्रिकेटला अलविदा केले.