Join us  

"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन

रोहित शर्मा लवकरच भारतासाठी ५००वा सामना खेळताना दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 7:29 PM

Open in App

rohit sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच भारतासाठी ५००वा सामना खेळताना दिसेल. रोहितच्या नेतृत्वात भारताने या वर्षी ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला. खरे तर हिटमॅनला त्याच्या फिटनेसवरुन अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र यावर भाष्य करणे त्याने वारंवार टाळले. पण, आता रोहितने एका पॉडकास्टमध्ये बोलताना टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. रोहितला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत काही खास करता आले नाही. 

१७ वर्षांपासून क्रिकेट खेळणे आणि मी लवकरच ५००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळेन. ५०० आंतरराष्ट्रीय सामने केवळ मोजक्याच खेळाडूंनी खेळले आहेत. सामन्यासाठी आणि सामन्यानंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे लागते, असे रोहितने सांगितले. फक्त दहा खेळाडू ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची किमया साधू शकले आहेत. रोहित लवकरच अकरावा खेळाडू ठरेल. त्याने आतापर्यंत भारतासाठी ४८५ सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि राहुल द्रविड या चार भारतीयांनी ५०० सामने खेळले आहेत. 

रोहित ५०० सामन्यांचा टप्पा गाठणार रोहितने पुढे सांगितले की, एवढा मोठा पल्ला गाठण्यासाठी तुमच्या दिनचर्येबद्दल काहीतरी असले पाहिजे. तुम्ही तुमचा फिटनेस कसा सांभाळता हे महत्त्वाचे असते. स्वत:ला तयार ठेवणे आणि तुम्ही खेळासाठी कसे तयार आहात हे सर्वात महत्त्वाचे असते. रोहित २०२५ च्या सुरुवातीला ५०० सामन्यांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. आगामी काळात भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे.

दरम्यान, रोहित शर्माला त्याच्या स्फोटक खेळीसाठी ओळखले जाते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली २६४ धावांची अद्भुत खेळी आजतागायत भारतीयांच्या मनात ताजी आहे. जूनमध्ये पार पडलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात रोहितने कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याने रुद्रावतार दाखवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ