India vs England 3rd Test ( Marathi News ) : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ राजकोट येथे दाखल झाला. भारत-इंग्लंड यांच्यातली मालिका १-१ अशी बरोबरीत आहे आणि राजकोट येथे आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि भारतीय खेळाडूंची सोय येथील आलिशान हॉटेलमध्ये केली गेली आहे.
राजकोट येथील सयाजी हॉलेटमध्ये भारतीय संघ थांबला आहे आणि ११ ते १९ फेब्रुवारी येथे त्यांच्यासाठी खास सोय केली गेली आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना सौराष्ट्रची परंपरा दर्शविणारा खास Presidential Suite दिला गेला आहे. शिवाय खेळाडूंच्या मेन्यूमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांचा जास्त समावेश केला गेला आहे. यात फाफडा-जलेबी, खाख्रा, गाठिया, थेपला आणि खमण हे आहेत. रात्रीच्या जेवणात दही तिकरी, वघरेरा रोटलो ( बाजरीची भाकरी) व खिचडी कढी असे व्यंजन आहेत.
पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे दमदार पुनरागमन केले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. स्टार फलंदाज विराट कोहली उर्वरित तीन कसोटीत खेळणार की नाही, याची उत्सुकताही आता संपली आहे. कारण, बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात विराटचे नावच नाही. लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांचे तिसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघंही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळले नव्हते, तर श्रेयस अय्यरला दुखापतीचं कारण सांगून उर्वरित तीन कसोटीतून संघातून वगळले आहे.
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप