Join us  

चक्रीवादळात अडकलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा; या तारखेला मायदेशी परतणार सर्व खेळाडू

आपल्या विश्वविजेत्या संघाचे जंगी स्वागत करण्यासाठी क्रिकेट चाहते आतूर झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 9:39 PM

Open in App

Indian cricket team in Barbados : टीम इंडियाने (Team India) 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करुन T-20 विश्वचषकावर (T-20 World Cup) आपले नाव कोरले. या स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे झाला. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. पण, अद्याप भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्येच अडकून पडला आहे. 

सध्या भारतीय संघ बार्बाडोसमधील हॉटेलमध्ये अडकला आहे. याचे कारण म्हणजे, बार्बाडोसला धडकणारे चक्रीवादळ बेरील (Hurricane Beryl). वादळ इतके धोकादायक आहे की, त्यामुळे देशीतील सर्व उड्डाणांवर परिणाम झाला आहे. वादळाने बार्बाडोस आणि आसपासच्या भागात तर अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या वादळामुळेच अद्याप टीम इंडिया मायदेशी परतू शकली नाही.

टीम इंडिया बुधवारी रात्री दिल्लीत दाखल होणारदरम्यान, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बेरील चक्रीवादळ बार्बाडोसमधून गेले असून, जनजीवन हळूहळू रुळावर येत आहे. लवकरच विमानतळांवरही काम सुरू होईल आणि उड्डाणे सुरू होतील. त्यामुळेच भारतीय संघ लवकरच चार्टर्ड विमानाने मायदेशी दाखल होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ बुधवारी (3 जूलै) रात्री 8 च्या सुमारास दिल्लीला पोहोचू शकतो. 

भारतीय संघाने चौथ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव

2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. याआधी भारतीय संघाने 2007 चा टी-20 विश्वचषकही जिंकला होता. तर, 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.

या T20 विश्वचषकातील भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिजट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माविराट कोहली