Join us  

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा नवा लूक; प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून तयार केली जर्सी 

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 6:37 PM

Open in App

हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या लूकमध्ये दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन डे सामन्याच्या पुर्वसंध्येला भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. हैदराबाद येथील आयोजित एका कार्यक्रमात हा सोहळा पार पडला आणि यात खेळाडूंनी नवीन जर्सी परिधान करून रॅम्प वॉकही केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जर्सी पॉलिस्टरच्या पुनर्वापरातून तयार करण्यात आली आहे. या जर्सीच्या कॉलरच्या आतल्या बाजूला भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखांची नोंद करण्यात आली आहे. 

इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धेला खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया ( 9 जून ), न्यूझीलंड ( 13 जून), पाकिस्तान ( 16 जून), अफगाणिस्तान ( 22 जून), वेस्ट इंडिज ( 27 जून), इंग्लंड ( 30 जून), बांगलादेश ( 2 जुलै), श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध खेळणार आहे. 

 

टॅग्स :आयसीसी विश्वकप २०१९आयसीसीबीसीसीआय