दोन भारतीय क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा आणि मुरली विजय यांनी नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. दोघांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. पण, या दोघांनी पोस्ट केलेलं लेटर एकसारखंच असल्याचे समोर आले आहे. नेटिझन्सनी ही कॉपी पकडली आहे. राज्य क्रिकेटचे नाव वगळता प्रत्येक शब्द सारखाच आहे.
मुरली विजयने ३० जानेवारीला त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली, जी त्याच्या निवृत्तीच्या माहितीसाठी होती. भारतासाठी वन डे व ट्वेंटी-२० खेळलेल्या मुरली विजयने त्याच्या निवृत्तीबद्दल एक लांबलचक टीप शेअर केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या राज्य क्रिकेट संघटनेचे आभार मानले.
विजयने भारताकडून ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर २०१८ मध्ये पर्थ येथे अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच २००८-०९ मध्ये गौतम गंभीरचा पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच, २०१९ मध्ये विजय तामिळनाडूकडून अखेरचा प्रथम श्रेणी आणि अ श्रेणी क्रिकेट सामना खेळला होता. २०२० मध्ये तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळला होता.
३ फेब्रुवारी रोजी जोगिंदर शर्मानेही क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. जोगिंदर शर्माने २००७ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, जो ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता. या सामन्यात त्याने शेवटचे षटक टाकून विजयात मोलाची भूमिका बजावली. यानंतर तो २०१२ पर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला.
जोगिंदर शर्मा यांनी शेअर केलेल्या निवृत्तीच्या पोस्टवर चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जरी काही लोकांनी त्याची प्रत पकडली. जोगिंदर शर्मा यांनी शेअर केलेले निवृत्तीचे पत्र मुरली विजयच्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये जसे लिहिले होते तसे लिहिले होते. प्रत्येक शब्द सारखाच लिहिला होता, म्हणूनच लोक असेही म्हणत आहेत की जोगिंदरने मुरली विजयच्या निवृत्तीच्या पोस्टची कॉपी केली आहे.
२४ जानेवारी २००७ मध्ये तो भारताकडून शेवटची वन डे खेळला होता. त्याने ४ वन डे सामन्यांत ३५ धावा केल्या व १ विकेट घेतली. तर ४ ट्वेंटी-२०त ४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आज निवृत्ती जाहीर करताना त्याने
बीसीसीआय व टीम इंडियाचे आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Indian Cricket team player Joginder Sharma and Murali Vijay same retirement note
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.