Join us  

विराटनं गुरुग्राममधील कार्यालयीन जागा दिली भाड्यानं; किंमत ऐकून सगळेच अवाक्

विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 8:33 PM

Open in App

Virat kohlis restaurant in gurugram: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने मागील महिन्यात एका मुलाला जन्म दिला. त्यामुळे किंग कोहली इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकला. विराटच्या मुलाचे नाव 'अकाय' असे ठेवण्यात आले आहे. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असणारा विराट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण विराटने गुरूग्राममधील त्याच्या मालकीची कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. त्याने १२ कार्यालयीन जागा पुढील नऊ वर्षांच्या कालावधीसाठी ८.८५ लाख रूपयांना मासिक भाडेतत्वावर दिली आहे. 

कार्यालयाची जागा गुरुग्राममधील सेक्टर ६८ मधील कॉर्पोरेट टॉवर रीच कॉमर्सिया नावाच्या प्रकल्पात स्थित आहे. हा परिसर १८,४३० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला आहे, विराट कोहलीचे हे रेस्टॉरंट ४० मजली इमारतीला लागून असलेल्या रेस्टॉरंट हबमध्ये आहे. या इमारतीत विराटचे रेस्टॉरंट दोन मजले आहे. टेरेसवर खाण्यापिण्याची सोय आहे आणि खालच्या मजल्यावर हवेशीर जागी बसण्याची सोय आहे. 

विराटने भाड्याने दिलेल्या जागेचे प्रति महिना सुरू होणारे मासिक भाडे ४८ रूपये प्रति चौरस फूट आहे. भाडेपट्टीत दरवर्षी ५% भाडे वाढीची तरतूद असते. तसेच सामान्य क्षेत्र देखभाल शुल्क प्रति चौरस फूट प्रति महिना १४ रूपये एवढे आहे. One8 Commune या नावाने उघडलेले हे रेस्टॉरंट नामांकित आहे. दरम्यान, किंग कोहली मुंबईतील वरळी येथे आलिशान घरामध्ये राहतो. कोहलीने २०१६ मध्ये हे अपार्टमेंट ३४ कोटी रूपयांत खरेदी केले होते. भारतीय संघ गुरूवारपासून इंग्लंडविरूद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. 

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटिदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड