नवी दिल्लीः पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी तमाम क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 'कोहली कंपनी'नं १९८३च्या विश्वविजयाची पुनरावृत्ती करावी, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. म्हणूनच सगळ्यांच्या नजरा टीम इंडियाच्या आत्ताच्या इंग्लंड दौऱ्याकडे लागल्यात. मात्र, या दौऱ्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत विराटसेना बऱ्याच मालिका खेळणार आहे आणि विश्वचषकानंतरही बऱ्याच महामालिका रंगणार आहेत. टीम इंडियाचं २०२३ पर्यंतचं भरगच्च वेळापत्रक बीसीसीआयनं जाहीर केलंय. ते क्रिकेटप्रेमींना खूश करणारं आहे.
२०१८
जुलै ते सप्टेंबर- इंग्लंड दौरा ५ कसोटी, ३ वनडे, ३ टी-२०
सप्टेंबर - आशिया चषक
ऑक्टोबर-नोव्हेंबर - मायदेशात विंडीजविरुद्ध मालिका३ कसोटी, ५ वनडे, ३ टी-२०
नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ - ऑस्ट्रेलिया दौरा४ कसोटी, ३ वनडे, ३ टी-२०
२०१९
जानेवारी-फेब्रुवारी - न्यूझीलंड दौरा५ वनडे, ३ टी-२०
फेब्रुवारी ते एप्रिल - मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका५ वनडे, २ टी-२० झिम्बाब्वेविरुद्ध १ कसोटी, ३ वनडे
मे ते जुलै - विश्वचषक स्पर्धा - इग्लंड
जुलै-ऑगस्ट - विंडीज दौरा २ कसोटी, ३ वनडे, ३ टी-२०
ऑक्टोबर ते डिसेंबर - मायदेशात द. आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामनेबांगलादेशविरुद्ध २ कसोटी आणि ३ टी-२०वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी-२०
२०२०
जानेवारी - ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर - ३ वनडे
फेब्रुवारी-मार्च - न्यूझीलंड दौरा२ कसोटी, ३ वनडे, ५ टी-२०
मार्च - मायदेशात द. आफ्रिकेविरुद्ध मालिका३ वनडे, ३ टी-२०
जून ते ऑगस्ट - श्रीलंका दौऱ्यात ३ वनडे, ३ टी-२०झिम्बाब्वेविरुद्ध ३ वनडे
सप्टेंबर - आशिया चषक
ऑक्टोबर - मायदेशात इंग्लंडविरुद्ध ३ वनडे, ३ टी-२०ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ टी-३०
ऑक्टोबर-नोव्हेंबर - आयसीसी टी-२० वर्ल्ड कप - ऑस्ट्रेलिया
नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ - ऑस्ट्रेलिया दौरा४ कसोटी, ३ वनडे
२०२१
जानेवारी ते मार्च - इंग्लंडविरुद्ध मायदेशात पाच कसोटींची मालिका
मार्च - मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध ३ वनडे
जून - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल
जुलै ते सप्टेंबर - श्रीलंका दौऱ्यात ३ टी-२० इंग्लंड दौऱ्यात - ५ कसोटी
ऑक्टोबर - द. आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे, ३ टी-२०
ऑक्टोबर-नोव्हेंबर - आयसीसी वर्ल्ड टी-२०
नोव्हेंबर-डिसेंबर - मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी, ३ टी-२०
डिसेंबर ते जानेवारी (२०२२) - दक्षिण आफ्रिका दौरा३ कसोटी, ३ टी-२०
२०२२
जानेवारी ते मार्चमायदेशात विंडीजविरुद्ध ३ वनडे, ३ टी-२० मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी, ३ टी-२०
मार्च - न्यूझीलंड दौरा - ३ वनडे
जुलै-ऑगस्ट इंग्लंड दौरा - ३ वनडे, ३ टी-२० विंडीज दौरा - ३ वनडे, ३ टी-२०
सप्टेंबर - आशिया चषक
ऑक्टोबर-नोव्हेंबर - मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी ३ टी-२०
नोव्हेंबर - बांगलादेश दौरा - २ कसोटी, ३ वनडे
डिसेंबर-जानेवारी (२०२३)मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ५ वनडे
२०२३
जानेवारी-फेब्रुवारीमायदेशात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी ३ वनडे
फेब्रुवारी-मार्च - विश्वचषक स्पर्धा - भारत