Join us  

भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड 

बऱ्याच लोकांना असा अनुभव आला असेल, याची मला खात्री आहे. तर मग Zomato टॅग करा आणि तुमच्यासोबत जे घडलंय ते सांगा," असे चहरने लिहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 9:58 AM

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने ( Deepak Chahar ) शनिवारी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomatoचा खराब अनुभव सोशल मीडियावर मांडला. गोलंदाजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे Zomato वर आरोप केले. "भारतात नवीन फ्रॉड सुरू आहे. Zomato वरून मी जेवण मागवले, पण मला ते न मिळताच त्यांच्या ॲप वर जेवण डिलिव्हर झाल्याचे दाखवले. मी कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर त्यांनीही मला हेच सांगितले आणि ते मला तुम्ही खोटं बोलत आहात, असे म्हटले. बऱ्याच लोकांना असा अनुभव आला असेल, याची मला खात्री आहे. तर मग Zomato टॅग करा आणि तुमच्यासोबत जे घडलंय ते सांगा," असे चहरने लिहिले.  चहरच्या या पोस्टवर दिलगिरी व्यक्त करताना Zomato ने उत्तर दिले की, "हाय दीपक, आम्ही तुमच्या अनुभवाबद्दल खूप चिंतित आहोत आणि गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. आम्ही अशा समस्या गांभीर्याने घेतो आणि तातडीने या प्रकरणाकडे लक्ष देत आहोत."

यावर चहर म्हणाला," बऱ्याच लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे आणि ऑर्डरचे पैसे परत देऊन कोणतीही योग्य कारवाई केली जात नाही, म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. उपासमार पैशाने भरून निघू शकत नाही." चहरला पुन्हा झोमॅटोने उत्तर दिले. त्यांनी लिहीले की, "आम्हाला या परिस्थितीचे गांभीर्य खरोखरच समजले आहे. मूळ समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तुमचे समाधान आमच्यासाठी सर्वोपरि आहे. तुमचा वेळ सांगा तेव्हा आम्ही आपल्या टीमला तुमच्याशी संवाद साधण्यास सांगतो. तुमचे सहकार्य खूप कौतुकास्पद आहे." इंडियन प्रीमियर लीगमध्ये दीपक चहर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.  

टॅग्स :दीपक चहरऑफ द फिल्डझोमॅटो