गाझियाबाद - २०१७ मध्ये मेरठमध्ये सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील सामन्यात उत्तर प्रदेशकडून खेळताना राजा बाबू नावाच्या खेळाडूने २० चेंडूत ६७ धावा कुटल्या होत्या. त्या खेळीमुळे राजाबाबूच्या फलंदाजीचं कौतुक होऊ लागलं होतं. त्याच्या फलंदाजीवर प्रभावित होऊन एका व्यावसायिकाने त्याला ई रिक्षा भेट दिली होती. तेव्हा ई रिक्षा आपल्या उदरनिर्वाहाचं साधन ठरेल असं त्याला वाटलंही नव्हतं. मात्र आता गेल्या दोन वर्षांपासून राजा बाबू गाझियाबादमध्ये ई-रिक्षा चालवत आहे.
राजा बाबू सांगतो की, कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीमुळे त्याची कारकीर्द आणि जीवन सारं काही बदलून गेलं. आता चार जणांचं कुटुंब सांभाळण्यासाठी आपल्याला रोज रस्त्यांवर येऊन मेहनत करावी लागते, असे त्याने सांगितले.
क्रिकेट खेळतानासुद्धा बाबूला इकडची तिकडची कामं करावी लागत होती. कधी कधी उत्पन्न वाढवण्यासाठी ई रिक्षासुद्धा चालवली. मात्र २०२० मध्ये खरी परीक्षा सुरू झाली. उत्तर प्रदेशमध्ये दिव्यांग क्रिकेटपटूसाठी तयार झालेली चॅरिटेबल संस्थास दिव्यांग क्रिकेट संघटना भंग करण्यात आली. त्यानंतर राजा बाबूच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत बंद पडला. त्यानंतर राजा बाबूने काही काळ गाझियाबादमध्ये दूध विकले. तसेच संधी मिळाली तेव्हा ई-रिक्षा चालवली.
डीसीए ही उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेशी संलग्न नव्हते. शर्मा यांनी सांगितले की, आम्ही काही स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने एक संघटना चालवली. स्पर्धेदरम्यान, ट्रान्सपोर्ट आणि खाण्याचा खर्च भागवला जात असे. डीसीएला बीसीसीआयची संलग्नता नव्हती. तसेच यूपीसीएचीही संलग्नता नव्हती. त्यामुळे खेळाडूंचा उत्पन्न निश्चित नव्हतं. मॅन ऑफ द मॅच सामन्यातून जे पैसे मिळतात तेच त्यांचं उत्पन्न असायचं.