Join us

लग्न झालेल्या महिलेशी केला भारताच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूने विवाह

एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये या दोघांची ओळख झाली. त्यावेळी या दिग्गज क्रिकेटपटूला ती महिला आवडली. या क्रिकेटपटूने तिची सर्व माहिती काढली. तिचे पहिले लग्न झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 19:11 IST

Open in App

मुंबई : क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे एक नाते आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये ज्या गोष्टी होतात, त्या क्रिकेटपटूंच्या आयुष्यामध्येही होतात. एका लग्न झालेल्या महिलेशी विवाह करण्याचा विचार सामान्य माणूस करू शकत नाही. पण भारताच्या एका दिग्गज क्रिकेपटूने लग्न झालेल्या महिलेशी विवाह केल्याचे समोर आले आहे.

या लव्ह स्टोरीमध्ये बरीचं वळणं आहेत. एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये या दोघांची ओळख झाली. त्यावेळी या दिग्गज क्रिकेटपटूला ती महिला आवडली. या क्रिकेटपटूने तिची सर्व माहिती काढली. तिचे पहिले लग्न झाले होते. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगीही होती. पण हा क्रिकेटपटू मात्र तिच्यावर फिदा होता. त्यामुळे अखेर या क्रिकेटपटूने तिच्याशी विवाह केला. आता ही गोष्ट कोणाची आहे, असा विचार तुम्ही करत असाल.

या दिग्गज क्रिकेटपटूने भारताचे सुवर्णयुग पाहिले आहे. त्याचबरोबर भारताचे कर्णधारपदही त्याने भूषवले आहे. भारताचे प्रशिक्षकपही त्याने सांभाळले आहे. ही गोष्ट आहे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि त्याची पत्नी चेतना यांची. कुंबळेचा आज 49वा वाढदिवस आहे.

चेतनाचे पहिले लग्न एका व्यावसायिकाशी झाले होते. या दोघांना एक मुलगीही होती. पण या दोघांमध्ये बिनसले होते. त्यामुळे चेतना मुलीबरोबर वेगळी राहत होती. दुसरीकडे कुंबळेला चेतनावर प्रेम बसले होते. त्यामुळे चेतनाने पहिल्या पतीबरोबर घटस्फोट घेतला आणि तिने कुंबळेबरोबर 1 जुलै 1999 या दिवशी लग्न केले.

टॅग्स :अनिल कुंबळे