Join us  

Axar Patel Marriage: प्रेमाच्या पिचवर भारतीय फिरकीपटूची पडली विकेट, अक्षर पटेलचा थाटामाटात झाला विवाह

अक्षरने पत्नी मेहासोबत केलेला डान्सही चांगलाच व्हायरल होतोय (Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 7:58 AM

Open in App

Axar Patel Marriage Video: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजेच २३ जानेवारीला सलामीवीर केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. आता त्याच्यानंतर स्टार अष्टपैलू अक्षर पटेलनेही लग्नगाठ बांधली आहे. अक्षरने त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत सात फेरे घेतले. अक्षर पटेलचे गुरुवारी (२६ जानेवारी) गुजरातमधील वडोदरा येथे लग्न झाले. अक्षरच्या मिरवणुकीचा व्हिडिओही समोर आला आहे. अक्षरची वरात घोड्यावरून न निघता कारमधून निघाली. त्याच्यासोबत कुटुंबीयदेखील कारमध्ये बसलेले दिसले. अक्षर आणि मेहाच्या मेंदी आणि हळदीचा विधीही झाला. त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. क्रिकेटर जयदेव उनाडकटही या सोहळ्यास हजर होता.

जयदेव उनाडकटने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यासोबतच अक्षर पटेलनेही त्याची वधू मेहासोबत संगीत सेरेमनीमध्ये डान्स केला. या डान्सचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. अक्षर पटेल आणि मेहाचे हळदीचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. अक्षर पटेल आणि मेहा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मेहा आणि अक्षर यांचा गेल्या वर्षीच सारखपुडा झाला होती. आता दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.

--

कोण आहे मेहा पटेल?

मेहा पटेल या व्यवसायाने न्यूट्रिशनिस्ट आहे. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनही शेअर करते. अक्षर पटेल आणि मेहा अनेकवेळा एकत्र सुट्टी घालवताना दिसले आहेत. नुकतेच दोघेही अमेरिकेला गेले होते.

--

वैयक्तिक कारणासाठी अक्षरने घेतला न्यूझीलंड मालिकेतून ब्रेक

अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध टी२० आणि वन डे मालिका खेळली होती. त्यात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंड विरुद्धची तीन सामन्यांची वन डे मालिका क्लीन स्वीप करून जिंकली. आता भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.

 

टॅग्स :अक्षर पटेललोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघलग्न
Open in App