अनुष्कापाठोपाठ भारताचा 'हा' क्रिकेटपटूही भटक्या कुत्र्यांसाठी सरसावला

मुंबईतील एका ठिकाणी सुरक्षा रक्षकानं केलेल्या अमानूष मारहाणीत भटका कुत्रा मरणावस्थेत आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 04:38 PM2019-07-30T16:38:38+5:302019-07-30T16:39:47+5:30

whatsapp join usJoin us
This Indian cricketer bat for Stray Dog's, know who is he? | अनुष्कापाठोपाठ भारताचा 'हा' क्रिकेटपटूही भटक्या कुत्र्यांसाठी सरसावला

अनुष्कापाठोपाठ भारताचा 'हा' क्रिकेटपटूही भटक्या कुत्र्यांसाठी सरसावला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : मुंबईतील एका ठिकाणी सुरक्षा रक्षकानं केलेल्या अमानूष मारहाणीत भटका कुत्रा मरणावस्थेत आला होता. या कुत्र्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी मारहाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. या सेलिब्रेटींमध्ये सोनम कपूर, मलायका अरोरा, जॉन अब्राहम आणि अनुष्का शर्मा यांचा समावेश होता. त्यांनी तर वरळी पोलीस स्थानकात FIR ही दाखल करण्याची मागणी केली होती. विराट कोहलीची पत्नी अनुष्कापाठोपाठ टीम इंडियातील एक खेळाडू भटक्या कुत्र्यांसाठी पुढे सरसावला आहे. त्यानं सोशल मीडियावर तसे आवाहन केले आहे.

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने मंगळवारी एक ट्विट केलं आणि त्यात त्यांनी भटक्या कुत्र्यांवरील  अमानुष मारहाणीला विरोध केला. तो म्हणाला,''100पैकी 99 कुत्री ही माणसांची प्रामाणिक असतात. पण, जर एखाद्या कुत्र्यानं चावल्यास माणसं 100 कुत्र्यांना मारतात. दुसरीकडे 100 पैकी 99 माणसं कुत्र्यांना दगड मारतात. पण, एका माणसानं कुत्र्याला जेवण दिले तर तो 100 माणसांवर विश्वास टाकतो. हा आहे दोघांमधला फरक. त्यामुळे भटक्या कुत्र्यांशीही नीट वागा.''



भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाला. 3 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. पण, युजवेंद्र चहलला केवळ वन डे संघात स्थान देण्यात आले आहे. या आधीही युजवेंद्रनं अनुष्का शर्माला इंस्टाग्रामवर फॉलो केले आहे. युजवेंद्रनं 49 वन डे सामन्यांत 84 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 31 सामन्यांत 46 विकेट्स आहेत. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच डावात सहा विकेट घेणारा चहल एकमेव गोलंदाज आहे. 

वन डेसाठी भारतीय संघ  - विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 
 

Web Title: This Indian cricketer bat for Stray Dog's, know who is he?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.