Deepak Chahar Jaya Bhardwaj: "क्रिकेट मॅचमधील दडपणापेक्षाही बायकोबरोबर..."; भारतीय क्रिकेटपटूचं मजेशीर मत

दीपक-जया १ जूनला अडकले विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:18 PM2022-06-20T19:18:34+5:302022-06-20T19:18:49+5:30

whatsapp join usJoin us
Indian Cricketer Deepak Chahar Feels More Pressure Than Cricket Match While Dancing With Hot Sexy Wife Jaya Bhardwaj Watch Video | Deepak Chahar Jaya Bhardwaj: "क्रिकेट मॅचमधील दडपणापेक्षाही बायकोबरोबर..."; भारतीय क्रिकेटपटूचं मजेशीर मत

Deepak Chahar Jaya Bhardwaj: "क्रिकेट मॅचमधील दडपणापेक्षाही बायकोबरोबर..."; भारतीय क्रिकेटपटूचं मजेशीर मत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Deepak Chahar Jaya Bhardwaj: भारतीय क्रिकेटर दीपक चहरने लग्नानंतर जवळपास तीन आठवड्यांनंतर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपक चहर पत्नी जया भारद्वाजसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. यासोबत त्याने लिहिले आहे की, पत्नीसोबत डान्स करताना क्रिकेट सामन्यात खेळण्यापेक्षाही जास्त दडपण असते, असे मजेशीर पद्धतीने त्याने लिहिले. दीपक चहरने १ जून रोजी त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्न केले. हा विवाह त्याच्या गावी आग्रा येथे पार पडला. त्याचवेळचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला.

आपल्या लग्नातील डान्सचा व्हिडिओ शेअर करत दीपक चहरने हॅशटॅगद्वारे असेही सांगितले की, त्याला हा डान्स जबरदस्तीने करावा लागला आणि हा त्याचा पहिला आणि शेवटचा डान्स होता. त्यानंतर तो नाचणार नाही. अर्थात हे सारं त्याने अतिशय मजेशीर पद्धतीने लिहिलं आहे. दीपक चहरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो पत्नी जया भारद्वाजसोबत 'मिस खिलाडी चाहिये' या गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे १९९७ च्या 'मिस्टर और मिसेस खिलाडी' चित्रपटातील आहे. त्यात अक्षय कुमार आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते. दीपक आणि जया यांनी या गाण्यावर खूप रोमँटिक डान्स केला आणि दोघेही खूप छान दिसत होते. पाहा व्हिडीओ-

व्हिडीओमध्ये काही वेळेनंतर जया एकटीदेखील डान्स करताना दिसली. सोलो डान्स करताना तिने 'बोले चुडियाँ, बोले कंगना' हे गाणं निवडलं होतं. हे गाणं 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील आहे. या गाण्यावर तिने अप्रतिम डान्स केला.

दरम्यान, लग्नानंतर दीपक चहर क्रिकेटच्या मैदानात परतत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे चहर बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट खेळत नाहीये. आयपीएलमध्येही सामील होऊ शकला नव्हता. २९ वर्षीय दीपकने आता पुनरागमन केले असून तो नेट्समध्ये सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. चहरने शेवटचा सामना २० फेब्रुवारीला खेळला होता. यानंतर तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आणि पुनरागमना दरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली. त्यामुळे दिपक बऱ्याच दिवसांपासून एकही सामना खेळलेला नाही.

 

Web Title: Indian Cricketer Deepak Chahar Feels More Pressure Than Cricket Match While Dancing With Hot Sexy Wife Jaya Bhardwaj Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.