मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या हा त्याच्या दमदार खेळासोबतच खास लाईफस्टाईलसाठीही तितकाच लोकप्रिय आहे. हार्दिक पांड्याला हा महागड्या गाड्यांचा चांगलाच शौकीन आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने अनेक मोठ्या कंपन्यांच्या कार्स खरेदी केल्या आहेत. आता पुन्हा त्याच्या कार कलेक्शनमध्ये एका महागड्या गाडीचा समावेश झालाय.
(Image Credit: www.cartoq.com)
स्टायलिश हार्दिक पांड्याने नुकतीच ऑडी A6 ही महागडी कार खरेदी केली आहे. ऑडी A6 ही एक सेडान कार असून या कारची किंमत तब्बल 62.81 लाख रुपये इतकी आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख राहिल अंसारी यांनी स्वत: ही कार हार्दिक पांड्याकडे सोपवली.
काय आहे या कारची खासियत?
ही कार पेट्रोल आणि डीझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या इंजिनबाबात सांगायचं तर पेट्रोस मॉडेलमध्ये 1798 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. ही कार 0 ते 100 किमी प्रति तासाचा प्रवास करण्यासाठी 8.4 सेकंद लागतात. या कारची टॉप स्पीड 232 kmph इतका आहे.