Hardik Pandya Gym Video Viral: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेचा भाग होऊ शकला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा पाय मुरगळला होता आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. पण सध्या हा स्टार फलंदाज दुखापतीतून सावरत आहे. आता हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो नियमितपणे सराव करत असल्याची माहिती मिळत आहे. दुखापतीतून सावरूनच हार्दिकने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. पण पुन्हा त्याच्या करिअरला दुखापतीमुळे ब्रेक लागला.
हार्दिक सध्या तंदुरुस्त झाला असून तो आगामी आयपीएलमध्येही खेळताना दिसणार आहे. २०२४ च्या आयपीएल हंगामात दमदार पुनरागमनासाठी हार्दिक पांड्या खूप मेहनत घेत आहे. गेल्यावर्षी आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यामध्ये हार्दिक पांड्याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. आता जवळपास ६ महिन्यानंतर पांड्या घरच्या मैदानावर खेळताना दिसेल.
दरम्यान, हार्दिक पांड्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतो आहे. आपल्या दमदार पुनरागमनासाठी हा खेळाडू प्रचंड मेहनत घेत आहे. 'Turning up the heat' असं सूचक कॅप्शन या व्हिडीओला त्यानं दिलं.
हार्दिक पांड्याच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटऱ्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्दिकला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या दमात, नव्या रुपातील हार्दिकला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हार्दिक पांड्या आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व सांभाळेल.
पाहा व्हिडीओ -
Web Title: Indian cricketer hardik pandya share a gym workout video and give him atractive caption for the followers video goes viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.