नवी दिल्ली : भारताच्या एका क्रिकेटपटूला शनिवारी मैदानात खेळत असताना चेंडू लागला. चेंडू लागल्यावर त्याला दुखापत झाली. ही दुखापत एवढ्या गंभीर स्वरुपाची होती की, मैदानात थेट अॅम्ब्युलन्सच बोलवावी लागली.
संघातील क्रिकेटपटू क्षेत्ररक्षण करत असताना ही गोष्ट घडली. इंडियाचा एक खेळाडू सिली पॉइंटवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी त्याला चेंडू लागला. हा चेंडू लागल्यावर फिजिओने मैदानात धाव घेतली. फिजिओने उपचार केले. पण ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे मैदानात थेट अॅम्ब्युलन्सच बोलवावी लागली.
बेंगळुरुमध्ये सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये इंडिया रेड, इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन हे संघ सहभागी होतात. या संघांमध्ये आंतरराष्ट्रीय, भारतीय अ संघ आणि 19-वर्षांखालील संघातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. सध्या इंडिया रेड आणि इंडिया ग्रीन या संघांमध्ये सामना खेळवला जात आहे.
इंडिया ग्रीन संघातील प्रियम गर्गला फिल्डिंग करताना चेंडू लागला. त्यानंतर फिजिओला मैदानात बोलावण्यात आले. फिजिओने प्रियम गर्गला आइस पॅक लावला. पण त्याची दुखापत गंभीर असल्याचे वाटले आणि त्यामुळेच मैदानात अॅम्ब्युलन्स बोलवाली लागली.
Web Title: The Indian cricketer injured with a ball and ambulance came on the field
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.