Join us  

भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, दाक्षिणात्य सुपरस्टार सोबत झळकणार

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू असताना आणखी एक माजी खेळाडू चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 9:28 AM

Open in App

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू असताना आणखी एक माजी खेळाडू चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. ऑक्टोबर 2012मध्ये भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण चियाना विक्रमच्या नव्या तामीळ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. इरफान सध्या जम्मू-काश्मीर संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. त्यानं फेब्रुवारी 2019नंतर व्यावसायिक क्रिकेटपासूनही रजा घेतलेली आहे. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून इरफानच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाच्या वृत्ताला दुजोरा दिला. इरफान काम करणाऱ्या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही, हा चित्रपट अजय ज्ञानमुथू दिग्दर्शीत करणार आहेत, तर ललिथ कुमार निर्माता आहेत. इरफान सध्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर क्रिकेट समालोचन करतो.  

डिसेंबर 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या स्वींग गोलंदाजीनं इरफाननं भल्याभल्या फलंदाजांना हतबल केलं होतं. इरफाननं 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर 2821 धावा आणि 300 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. दुखापतीमुळे इरफानच्या क्रिकेट कारकिर्दीला मोठा धक्का बसला. 2012मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा ट्वेंटी-20 सामना हा त्याच्या अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता.   

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघTollywood