kl rahul injured | नवी दिल्ली : भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुल दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२३ मध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याने चालू हंगामातून माघार घेतली असून विश्रांती घेत आहे. खरं तर पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देखील राहुल मुकणार आहे. क्रिकेटपासून दूर असलेल्या राहुलने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. मोठा आणि किफायतशीर करार युवा क्रिकेटपटूंची दिशाभूल करू शकतो. तसेच त्यांना लवकर जास्त पैसे मिळाल्यावर त्यांचे करिअरपासून लक्ष विचलित होऊ शकते, असे राहुलने म्हटले आहे.
जास्त पैसे पाहून भरकटलो होतो - राहुलखासकरून जेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणी मार्गदर्शक नसतो तेव्हा हे असेच घडते, असे राहुलने स्पष्ट केले. "कोणत्याही चांगल्या मार्गदर्शनाशिवाय खूप लवकर जास्त पैसे मिळणे, एखाद्या खेळाडूचे लक्ष विचलित करू शकते. मला पैसे लवकर मिळाले नाहीत. माझ्या कारकिर्दीत सर्व काही टप्प्याटप्प्याने घडले आहे. मी हळू हळू सुरुवात केली आणि क्रिकेट खेळत गेलो. अगदी छोटा करार मिळविण्यासाठी देखील अनेक वर्षे वाट पाहावी लागली. सुरुवातीला जास्त पैसे पाहून माझेही मन भटकायचे, पण लवकरच मला याची जाणीव झाली", असेही राहुलने सांगितले. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज 'द रणवीर शो'मध्ये बोलत होता.
राहुलने त्याच्या पहिल्या कराराबद्दल म्हटले, "मला २०१८ मध्ये माझा पहिला मोठा करार मिळाला होता, तेव्हा मी कदाचित २५ किंवा २६ वर्षांचा होतो. तेव्हापासून माझ्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत आणि ते तुम्हाला खूप काही शिकवतात. सुरुवातीच्या काळात मोठा करार पाहून माझे मन भटकायचे. मी माझा पहिला पगार पाहून असंतुलित झालो, पण मला ते लवकर कळले आणि मग शांत झालो."
IPL 2023 Play Offs Scenario : 'बुडता' पंजाब! PBKS चा पराभव RCBसाठी आशादायक, पण MIचं टेशन वाढलं
दरम्यान, दुखापतीमुळे लोकेश राहुल आयपीएलपाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकणार आहे. त्याने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली.
WTC फायनलसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.