भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवालने विमानात आजारी पडल्यानंतर आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 32 वर्षीय मयंकने काही कट रचल्या गेल्याचा आरोप करत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्याने विमानात पाणी समजून एका पाउचने एक पेय प्यायले. यानंतर तो आजारी पडला होता. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे, हे पाउच विमानात त्याच्या सीटवर ठेवण्यात आले होते.
बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला हा सलामीवीर रणजी ट्रॉफी खेळत आहे. कर्नाटकचा कर्णधार म्हणून त्याने त्रिपुराविरुद्धच्या दोन्ही डावांत 51 आणि 17 धावा केल्या, यानंतर तो संघाच्या पुढील सामन्यासाठी दिल्लीमार्गे सुरतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बसलेला होता.
मयंक विरुद्ध काही कट? -आता मयंक दोन फेब्रुवारीला सूरतमध्ये रेल्वे विरुद्धचा खेळला जाणारा पुढील रणजी ट्रॉफी सामना खेळू शकणार नाही. 32 वर्षीय मयंकने भारतासाठी 21 कसोटी सामने खेळे आहेत. संबंधित प्रकरणावर बोलताना, पश्चिम त्रिपुराचे एसपी किरन कुमार यांनी सांगितले की, ‘या प्रकरणाच्या चौकशीसाठी NCCPS (न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलीस ठाणे) मध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.’ सीट वर ठेवण्यात आलेले पेय घेताच त्याच्या तोंडात जळजळ व्यायला सुरुवात जाली. यामुळे त्याला काही बोलताही आले नाही. यानंतर त्याला आयएलएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तोंडात सूज आणि छाले आले होते. आता त्याची प्रकृती स्थीर आहे.'