Join us

Mohammad Shami: मोहम्मद शमीने घेतली आलिशान Jaquar Sports Car; ३ सेकंदात स्पीड १०० पार, किंमतही तशीच

एका खास कारणासाठी मोहम्मद शमीने ही कार स्वत:लाच गिफ्ट केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:01 IST

Open in App

Mohammad Shami: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला विंडिज दौऱ्यावर विश्रांती देण्यात आल्याने तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे. या दरम्यान त्याने स्वत:साठी एक नवीन आलिशान स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. वन डे क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा पूर्ण केल्यानंतर शमीनेच स्वतःला ही कार गिफ्ट केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज असल्याने शमीने आपल्या गोलंदाजीप्रमाणेच वेगवान अशी लाल रंगाची जॅग्वार एफ-टाइप (Jaguar F-Type) कार खरेदी केली आहे. ही एक स्पोर्ट्स अवघ्या ३.७ सेकंदात वेगाची शंभरी गाठते.

कारची किंमत एक कोटीहूनही जास्त

या आलिशान स्पोर्ट्स कारचे इंजिन V8 331 kW आहे. त्यामुळे ही कार अवघ्या काही सेकंदात 100 चा वेग गाठते. या कारची शोरूममधील किंमत ९८.१३ लाख रुपये इतकी आहे. तर ऑन रोड या कारची किंमत एक कोटीहून अधिक असेल यात शंकाच नाही. आलिशान असा जॅग्वार एफ-टाइप कारमध्ये 8 पर्यंत ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.

३१ वर्षीय शमीने नुकतीच ही कार खरेदी केली आहे. शमी आणि शिवा मोटर्सचे संचालक अमित गर्ग यांनी कारसोबत पोज दिली आहे. अमित गर्गने कारच्या चाव्या शमीला देताना एक फोटो क्लिक करण्यात आला आहे. अमित यांनी त्याच्या लिंक्डइन अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या सोबतच शमीने अमित गर्ग यांला त्यांच्या स्वाक्षरीचा एक क्रिकेट बॉलही गिफ्ट दिला आहे. अमित यांनी हे सर्व फोटो शेअर केले आहेत.

शमीकडे अनेक आलिशान कार आणि बाईक्स

मोहम्मद शमीच्या मालकीची ही पहिलीच लक्झरी कार नाही. त्याच्याकडे अनेक कार्स आणि बाईक्स आहेत. शमीकडे टोयोटा फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू 5 सीरीज आणि ऑडी कार देखील आहे. नुकतीच शमीने बुलेटही घेतली आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो त्याने शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या रॉयल एनफिल्ड जीटी 650 या बाइकची झलक दाखवली आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीव्हायरल फोटोज्कारभारतीय क्रिकेट संघ
Open in App