बंगळुरू : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची एका कंपनीनं कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी द्रविडने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बंगळुरुमधील विक्रम इनव्हेस्टमेंट या कंपनीनं द्रविडला चुना चार कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या कंपनीने देशातील 800 जणांना चुना लावला आहे. अनेक दिग्गजांना 300 कोटी रुपयांचा चुना या कंपनीनं लावला आहे. या कंपनीनं 40 ते 50 टक्के परतावा देण्याचं आश्वासन ग्राहकांना दिलं होतं.
विक्रम इनव्हेस्टमेंट या 800 जणांपैकी अनेकजण चित्रपट, खेळ आणि राजकारणाशी जोडले गेले आहेत. पोलिसांनी कंपनीचा मालक राघवेंद्र श्रीनाथ आणि एजंट म्हणून काम करणारा सुतराम सुरेश, नरसिम्हामूर्ती, केसी. नागराज आणि प्रल्हाद यांना अटक केली आहे. या आरोपींपैकी अटकेत असलेला सुतराम सुरेश हा माजी क्रीडा पत्रकार होता. खेळाडूंनी सुरेशच्या माध्यमातून या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. डायरेक्टर राघवेंद्रच्या अटकेनंतर फसवणूक झालेले अनेकजण समोर आले आहेत. द्रविडशिवाय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि प्रकाश पादुकोण यांचीही या कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं बंगळुरूमधल्या एका कंपनीविरोधात सदाशीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या कंपनीमध्ये द्रविडनं 20 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती पण फक्त 16 कोटी रुपयेच परत मिळाले. आपली चार कोटी रुपयांची फसवणूक झाली, अशी तक्रार राहुल द्रविडनं केली आहे. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा तीन मार्चला समोर आला. पीआर बालाजी नावाच्या गुंतवणूकदारानं कंपनीविरोधात 11.74 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.