मुंबई, आयसीसी 2019 : बीसीसीआयने सोमवारी दुपारी 3.15 च्या सुमारास वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला. कोणाच्या ध्यानी मनी नसताना अष्टपैलू रवींद्र जडेजाला 15 सदस्यीस संघात स्थान देण्यात आले. याच जडेजाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेत संघात स्थान देण्यात आले नव्हते. हार्दिक पांड्यानं माघार घेतली, म्हणून त्याची वर्णी लागली. त्यातही मिळालेल्या तीन संधीत त्याला फार काही छाप पाडता आली नाही. त्यामुळेच जडेजाची निवड सर्वांना आश्चर्यात टाकणारी ठरत आहे. संघ निवडीनंतर बरोबर चार तासांनी जडेजाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जडेजाच्या या निवडीमागे भाजपा कनेक्शन असल्याची चर्चा रंगत आहे.
जडेजाची पत्नी रिवाबाने नुकताच भाजपा प्रवेश केला आणि रिवाबा जामनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवत आहे. गेल्या महिन्यात रिवाबाने भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे जडेजाची मोठी पंचायत झाली होती. कारण, त्याच्या वडीलांनी आणि बहिणने गेल्या महिन्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, जडेजाने अखेर सोमवारी भाजपाला पाठींबा जाहीर केला.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनीही जडेजाचे स्वागत केले. त्यांनीही ट्विट करत लिहीले की,''
रवींद्र जडेजाचे आभार... आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाल्याबद्दल तुझे अभिनंदन.''
भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
Web Title: Indian cricketer Ravindra Jadeja backs BJP after world cup selection
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.