Rinku Singh's father viral video : कोलकता नाईट रायडर्सचा गेमचेंजर खेळाडू म्हणून रिंकू सिंह यांची ख्याती आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ५ चेंडूवर ५ षटकार मारणारा हा झंझावती खेळाडू रिंकू सिंह रातोरात स्टार झाला. त्याने १४ इनिंगमध्ये ४७४ धावा काढत आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने या खेळाडूचा क्रिकेट विश्वातील प्रवास सुरु झाला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रिंकू सिंहचे वडील खानचंद्र सिंह एलपीजी सिलिंडरचे वाटप करताना दिसत आहेत.आपला लेक प्रसिद्धीच्या शिखरावर असताना या खेळाडूचे वडील आजही गॅस सिलेंडर वाटप करण्याचे काम करतात. अलिगढमध्ये छोट्याश्या घरामध्ये राहणाऱ्या रिंकूने जरी क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली असली तरी त्याच कुटुंबीय आजही साधसं जीवन जगत आहेत. महिना दहा हजार कमवून रिंकूच्या वडिलांनी त्यांच्या मुलांना वाढवलंय. या खेळाडूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. शिवाय मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो.
नुकताच सोशल मीडियावर रिकूंच्या वडिलांचा व्हायरल होणारा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये रिकूंचे वडिल एका गॅस सिलिंडरच्या गाडीवर ग्राहकांना सिलिंडरचे वितरण करताना दिसत आहेत. त्यांच्या या साधेपणाचं नेटकरी तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांना प्रचंड आवडलाय. या व्हायरल व्हिडीओ क्रिकेटप्रेमींना चांगलाच भावलाय. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रिंकूला त्याच्या वडिलांच्या कामाविषयी विचारणा केली असता , "मी माझ्या वडिलांना सांगितले की तुम्ही आता आराम करा" तरीही त्यांना अजूनही ते काम आवडतं" अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.
Web Title: Indian cricketer rinku singh father seen delivering lpg gas cylinder video goes viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.