मेरा पिछा छोडो बेहेन! रिषभ पंतचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला प्रत्युत्तर?; क्रिकेटपटूची इंस्टा पोस्ट व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या प्रेमाच्या अफवांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला त्यानंतर क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल झालीय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:31 PM2022-08-11T12:31:48+5:302022-08-11T12:32:08+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricketer Rishabh Pant hit back at Urvashi Rautela after 'RP' interview? Indian cricketer's Insta post goes viral | मेरा पिछा छोडो बेहेन! रिषभ पंतचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला प्रत्युत्तर?; क्रिकेटपटूची इंस्टा पोस्ट व्हायरल

मेरा पिछा छोडो बेहेन! रिषभ पंतचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला प्रत्युत्तर?; क्रिकेटपटूची इंस्टा पोस्ट व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या प्रेमाच्या अफवांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला त्यानंतर क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल झालीय. अभिनेत्रीने एका मुलाखतीत RP असा उल्लेख करून भारतीय क्रिकेटपटूसोबतच्या प्रसंगाचा संपूर्ण किस्सा सांगितला. त्याबाबतचा एक व्हिडीओ काल दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आज रिषभ पंतची इंस्टा पोस्ट व्हायरल होतेय आणि यष्टिरक्षकाने ही पोस्ट खास उर्वशीसाठी लिहिल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अभिनेत्रीला भेटण्यासाठी रिषभला १६ तास प्रतीक्षा करावी लागली होती आणि त्यानंतर रिषभ-उर्वशीच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. पण, रिषभने २०२०मध्ये प्रेयसी इशा नेगीसोबतचा फोटो पोस्ट करून या चर्चांना पूर्णविराम लावला. उर्वशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात एका मुलाखतीत तिने रिषभसोबतच्या त्या भेटीवर स्पष्ट मत मांडले आहे.

उर्वशीने सांगितले की,''मी वाराणसीहून शूटींग संपवून दुसऱ्या प्रोजेक्टसाठी दिल्लीत दाखल झाली. वेळापत्रक एवढं व्यग्र होतं की मला कोणाला भेटण्याचीही वेळ नव्हती. दिल्लीत शुटींग करून झाल्यानंतर मी एवढी थकली होती की १० तास झोपून राहिले. त्या दरम्यान ६०-७० मिस्ड् कॉल माझ्या मोबाईलवर येऊन गेले होते. उठल्यावर ते मी पाहिले. ती व्यक्ती ( तिने रिषभचं नाव नाही घेतलं) मला भेटण्यासाठी वाट पाहत होती आणि त्यानंतर मी त्याला भेटले. मीडियाने ही गोष्ट एवढी रंगवली की...''

रिषभने इंस्टा पोस्टमध्ये काय लिहिलेय ते वाचा...  
तुरळक प्रसिद्धीसाठी काही लोकांना मुलाखतीत खोटं बोलताना पाहून, गंमत वाटतेय. त्यांना हेडलाईनमध्ये राहायचे आहे. लोकं प्रसिद्धीसाठी एवढे तहानलेले आहेत, हे पाहून दुःख होतंय. #merapichachorhBehen #Jhutkibhilimithotihai

Web Title: Indian cricketer Rishabh Pant hit back at Urvashi Rautela after 'RP' interview? Indian cricketer's Insta post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.