Sachin Tendulkar Test Cricket ICC Award : सचिन तेंडुलकर हा भारतीयांसाठी क्रिकेटचा देव. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध अशा कारकिर्दीत १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली. ४० हजारांहून अधिक धावा केल्या. असंख्य रेकॉर्ड्स मोडली. सचिनने २०० कसोटी सामन्यांच्या ३२९ डावांमध्ये सर्वाधिक १५,९२१ धावा आणि सर्वाधिक ५१ शतके ठोकली. सचिनला आपल्या करियरमध्ये भरपूर पुरस्कार मिळाले, अनेक बहुमान मिळाले पण तरीही त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला एक बहुमान मिळवता आला नाही. जाणून घेऊया त्याबद्दल...
जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहने जगभरातील क्रिकेटपटूंना हरवून 'आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार मिळवणारा बुमराह सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. मात्र, 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर या बाबतीत कधीच 'लकी' ठरला नाही. कसोटीत सर्वाधिक धावा आणि शतके त्याच्या नावावर आहेत, तरीही आयसीसीने त्याला हा पुरस्कार कधीच दिला नाही. २०१० साली त्याचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले होते, पण त्यावेळी वीरेंद्र सेहवाग वरचढ ठरला.
सचिनने १९८९ मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. ICC ने हा पुरस्कार २००४ पासून देण्यास सुरुवात केली. यानंतरच्या ९ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिनला कधीही वर्षभरातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवता आला नाही. २००४ ते २०२४ या कालावधीत ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कुणी जिंकला ते पाहूया.
- २००४ - राहुल द्रविड
- २००५ - जॅक कॅलीस
- २००६ - रिकी पॉन्टींग
- २००७ - मोहम्मद युसूफ
- २००८ - डेल स्टेन
- २००९ - गौतम गंभीर
- २०१० - वीरेंद्र सेहवाग
- २०११ - अलिस्टर कूक
- २०१२ - कुमार संगाकारा
- २०१३ - मायकल क्लार्क
- २०१४ - मिचेल जॉन्सन
- २०१५ - स्टीव्ह स्मिथ
- २०१६ - रविचंद्रन अश्विन
- २०१७ - स्टीव्ह स्मिथ
- २०१८ - विराट कोहली
- २०१९ - पॅट कमिन्स
- २०२१ - जो रूट
- २०२२ - बेन स्टोक्स
- २०२३ - उस्मान ख्वाजा
- २०२४ - जसप्रीत बुमराह
Web Title: Indian cricketer Sachin Tendulkar never got an Test Cricketer of the year award in cricket career Jasprit Bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.