Ayodhya Ram Mandir Inauguration : आज २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश रामनामाच्या जयघोषाने दुमदुमला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती अयोध्या नगरीत दाखल झाले. रामललाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून रामभक्त आयोध्येत पोहोचले.
रामललाच्या प्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरासह भारतातील प्रत्येक भागात आनंदाचे वातावरण आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भारतीय किकेटर्स देखील दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मुंबईहून अयोध्येत दाखल झाला आणि सचिनने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.
येथे पाहाः
अवघ्या जगाचं या सोहळ्याकडे लक्ष लागलेलं होतं. तब्बल ५०० वर्षांच्या संघर्षानंतर हे भव्य दिव्य मंदिर उभे राहिल्याने देशवासियांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. या भव्य दिव्य सोहळ्यात सचिनसोबत इतर अनेक क्रिकेटपटूंनाही आमंत्रित करण्यात आले होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद अयोध्येत पोहोचले आणि ते या ऐतहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनले.
पाहा :
तर दुसरीकडे भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेही अयोध्येला पोहोचले. शिवाय भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आणि माजी दिग्गज धावपटू पीटी उषाही अयोध्येत पोहोचल्या.
पाहा व्हिडीओ :