Shikhar Dhawan Emotional : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवन त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असतो. शिखर आणि त्याच्या पत्नीचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने धवनचा त्याची विभक्त पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीश हरीश कुमार यांनी धवनने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाच्या अर्जात केलेले सर्व आरोप या आधारावर मान्य केले की पत्नी आयशा मुखर्जी स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली. आयशाने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.
दरम्यान, वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत राहणारा धवन आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याचे कारण म्हणजे भारतीय खेळाडूने केलेली एक पोस्ट. खरं तर शिखर धवनने त्याच्या लेकासाठी एक खास पोस्ट केली असून तो भावूक झाल्याचे दिसते. धवनने मुलासोबतच्या व्हिडीओ कॉलचा फोटो शेअर करत म्हटले, "मी तुला प्रत्यक्ष भेटून एक वर्ष झालं आहे आणि आता जवळपास तीन महिन्यांपासून मला सगळीकडून ब्लॉक केलं गेलं. त्यामुळे माझ्या बाळा, मी तुला इथूनच तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरी मी मनाने तुझ्या संपर्कात असेन. मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला माहित आहे की तू खूप छान करत आहेस."
शिखर धवन भावूक
धवनने लेकासाठी आणखी लिहले की, बाळा तुझा बाबा नेहमी तुझी आठवण काढतो आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो नेहमी सकारात्मक असतो, देवाच्या कृपेने जेव्हा आपण पुन्हा भेटू या आशेने हसतमुखाने वाट पाहत असतो. मस्ती कर, मजा कर पण विध्वंसक होऊ नको, नम्र, दयाळू, सहनशील आणि बलवान व्हो... तुला मी दिसत नाही, पण मी दररोज तुझ्यासाठी काहीतरी मेसेज लिहित असतो. तुझ्या भविष्याबद्दल सतत विचार करत असतो. तुझ्या बाबाकडून तुला खूप सारे प्रेम 'झोरा'."
Web Title: Indian cricketer Shikhar Dhawan has posted an emotional post on the occasion of his daughter Zora's birthday
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.