Join us

अनन्यासोबत दिसला शुबमन गिल; मग सोशल मीडियावर रियानसाठी क्रिएट झाला 'दिल-जले' सीन

शुबमन गिलसह अनन्या पांडे हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:33 IST

Open in App

भारताचा स्टार बॅटर शुबमन गिल मैदानातील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील गोष्टींमुळेही अनेकदा चर्चेत असतो. दुलीप करंडक ट्रॉफीत जलवा दाखवण्याआधी तो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत स्पॉट झाला. ही जोडी एकत्र झळकल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रियान परागची फिरकी घेतल्याचा सीन पाहायला मिळाला.

शुबमन गिल अन् अनन्या पांडेची जमली जोडी 

शुबमन गिल याने बॉलिवूड अभिनेत्रीसोबत एक जाहिरात केली आहे. गिलसह अनन्या पांडेनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. जे सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. ही जोडी एकत्र दिसल्यावर नेटकऱ्यांनी रियान परागला ट्रेंडिगमध्ये आणलं आहे. दोन स्टार क्रिकेटर आणि लोकप्रिया बॉलिवूड अभिनेत्री यांच्यासंदर्भातील खतरनाक मीम्सही पाहायला मिळत आहेत. 

त्यात अशी झाली रियान परागची एन्ट्री

अनन्या पांडे आणि शुबमन गिल यांचा फोटो व्हायरल होत असताना रियान पराग ट्रेंडमध्ये येण्याला एक खास कारण आहे. कारण बॉलिवूड अभिनेत्री अनन्या ही राजस्थान रॉयल्सच्या स्टार  रियान परागची क्रश असल्याचा मुद्दा याआधी चांगलाच गाजला होता. रियानच्या सर्च हिस्ट्रीच्या माध्यमातून हा क्रिकेटर अनन्या पांडेवर फिदा असल्याची  गोष्ट सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळेच हा दाखला देत नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेतलीये.

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अशा केल्या कमेंट्स 

अनन्या ही शुबमन गिलसोबत दिसल्यामुळे रियान पराग ट्रेंडमध्ये आला आहे. एका वापरकर्त्याने तर रियान परागसाठी ''दुश्मन न करे दोस्त ने जो किया है.'' हे गाणं वाजवत ट्रोल केल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी रियान पराग याच्या युट्यूबवरील सर्च हिस्ट्रीचा सीन समोर आल्यापासून अनेकजण या क्रिकेटरच्या मनात अनन्या पांड्येसाठी खास जागा असल्याचे, बोलले जाते. पण रियान किंवा अनन्या यांनी मात्र यावर कधीही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅग्स :ऑफ द फिल्डशुभमन गिलअनन्या पांडे