रोहित शर्मा विश्वचषक 2027 पूर्वीच घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वतःच केला मोठा खुलासा!

रोहित शर्माचे वाढते वय पाहता, तो 2027 च्या विश्वचषकापर्यंत एकदिवसीय आणि कसोटी फॉर्मेटमधूनही निवृत्ती घेईल, असा अंदाज बांधला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 03:40 PM2024-07-15T15:40:50+5:302024-07-15T15:42:53+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricketer t20 world cup 2024 winning captain rohit sharma big statement about retirement | रोहित शर्मा विश्वचषक 2027 पूर्वीच घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वतःच केला मोठा खुलासा!

रोहित शर्मा विश्वचषक 2027 पूर्वीच घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वतःच केला मोठा खुलासा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गेल्या महिन्यात भारतीय संघाने टी २० विश्वचषक जिंकला. यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित शर्माने म्हटले आहे की, तो आणखी काही काळ तरी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील. विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने सध्या ब्रेक घेतला आहे. तो श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्येही खेळणार नाही. रोहित शर्माचे वाढते वय पाहता, तो २०२७ च्या विश्वचषकापर्यंत एकदिवसीय आणि कसोटी फॉर्मेटमधूनही निवृत्ती घेईल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, रोहितला वनडे आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्यासंदर्भात विचारले असता, आपण फार लांबचा विचार करत नाही, असे तो म्हणाला.

केव्हा घेणार निवृत्ती - 
निवृत्तीसंदर्भात विचारले असता रोहित म्हणाला, ‘मी आधीच बोललो आहे की, मी फार पुढचा विचार करत नाही. किमान आपण मला काही काळ तरी खेळताना बघू शकता.’ यापूर्वी, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले होते की, रोहित शर्मा २०२३-२५ ​​च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आणि पुढील वर्षात फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीही भारतीय संघाचा कर्णधार राहील. 

रोहित शर्मा टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्येही भारताचा कर्णधार होता. यावेळी इंग्लंडने भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव केला होता. यानतंरच्या वर्षी भारतात झालेल्या ५० ओव्हर्सच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने वेस्टइंडीज आणि अमेरिकेत खेळल्या गेलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२४ में आखिरकार ट्रॉफी अपने नाम कर ही ली. 

टी-२० इंटरनॅशनलमध्ये ४२३१ धावा -
रोहित शर्माने क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉरमॅटमधून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या रुपात निवृत्ती घेतली आहे. रोहितने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४२३१ धावा केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक 5 शतकेही झळकावली आहेत. 

Web Title: Indian cricketer t20 world cup 2024 winning captain rohit sharma big statement about retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.