Join us  

Yuvraj Singh Arrested : क्रिकेटपटू युवराज सिंग याला अटक, तीन तास कसून चौकशी; जाणून घ्या नेमकं प्रकरण 

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला ( Yuvraj Singh Arrested) रविवारी हरियाणाती हांसी येथे पोलिसांनी अटक केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 9:24 PM

Open in App

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला ( Yuvraj Singh Arrested) रविवारी हरियाणाती हांसी येथे पोलिसांनी अटक केले. युवराजनं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यावर जातीवाचक टिप्पणी केली होती आणि त्याविरोधात हांसी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. त्यानं ही टिप्पणी मागच्या वर्षी रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅट दरम्यान केली होती आणि त्यात त्यानं युझवेंद्र चहलवर अपमानजनक टिप्पणी केली होती,  

हांसी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हायकोर्टाच्या  आदेशानंतर युवराजला औपचारिक जामिनावर सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात हायकोर्टानं युवराजला जामिन दिला होता. हांसी पोलिसांनी औपचारिकता म्हणून त्याला अटक केली. यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आणि नंतर त्याला सोडण्यात आले.  युवराजसह सुरक्षारक्षक आणि ४-५ स्टाफ व वकील होते. 

 नेमकं काय आहे प्रकरण?युवराज सिंगच्या विरोधात हरयाणा येथे FIR दाखल करण्यात आले आहे. २०२०च्या इंस्टाग्राम लाईव्ह सत्रात वर्ल्ड कप विजेत्या युवीनं 'जातीवाचक टिप्पणी' केली होती. त्याची ही टिप्पणी दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला आणि त्याबाबत नंतर युवीनं माफीही मागितली होती.

हरयाणामधील हिसार येथील वकिलांनी ८ महिन्यांपूर्वी पोलिस स्थानकात युवीविरोधात तक्रार दाखल केली होती. इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार ८ महिन्यांनंतर हरयाणा पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केला होता. हिसार क्षेत्रात येणाऱ्या हन्सी पोलिस स्थानकात युवीविरोधात IPC कलम (Sections) 153, 153A, 295, 505, उपकलम 3 (1) (r) and 3 (1) (s) of the SC/ST Act नुसार FIR दाखल झाला होता. 

रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) इंस्टाग्रामवर चॅट करताना त्यानं चहलबद्दल ( Yuzvendra Chahal) आक्षेपार्ह विधान केलं होतं. दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला 'भंगी' असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. ''ये भं**** लोगो को काम नही है, ये युझी और इसको ( कुलदीप)'' असे युवी रोहितला म्हणाला होता.  

टॅग्स :युवराज सिंगयुजवेंद्र चहलरोहित शर्माहरयाणा
Open in App