भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याच्या बातम्या मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. 15 दिवसांच्या सोशल मीडियावरील चर्चेनंतर युजवेंद्रने इस्टाग्राम स्टोरीवरून या अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर धनश्रीनेही भलीमोठी पोस्ट करून तिचे मन मोकळे केले. पण, आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात धनश्रीने 'माहेरी' जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयानंतर फिरकीपटू चहल आनंदाने डान्स करताना दिसतोय.
धनश्रीने हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात दिवाना या चित्रपटातील तेरी इसी अदा हे गाणंही वाजतंय. धनश्रीचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स लोटपोट होत आहेत.
चहल काय म्हणाला होता?
युजवेंद्र चहलची पहिली प्रतिक्रिया आली. त्याने लिहिले की, माझ्या आणि धनश्री यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. या सर्व चर्चा आता थांबवा. सर्वांना खूप खूप प्रेम.
धनश्रीची पोस्ट
"इन्स्टाग्रामसाठी रील शूट करत असताना मी डान्स करताना पडले आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याने लिगामेंट टिअर झालं. मी घरात फक्त बेड ते काऊच इतकीच चालू शकत होते, त्यासाठीही मला फिजीओची मदत घ्यावी लागत होती. पण आता मी सावरते आहे. आणि त्यात मला माझ्या जवळच्यांचा पाठिंबा खूप फायद्याचा ठरला. मला सावरण्यासाठी मदत केल्याबद्दल माझा नवरा (युजवेंद्र चहल), माझे कुटुंब आणि माझे जवळचे मित्र यांचे मी आभार मानते", असे धनश्रीने स्पष्ट करत युजी चहल आणि तिच्यात सारं आलबेल असल्याचे संकेत दिले.