जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय खेळाडू आघाडीवर आहेत. बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे आणि 2020मध्ये त्यांनी जवळपास 3200 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे खेळाडूंनाही बीसीसीआय तगडा पगार देते. बीसीसीआयनं त्यांच्या खेळाडूंची A+, A, B, C अशा चार ग्रेडमध्ये विभागणी केली आहे. ग्रेड A+ मधील खेळाडूला वर्षाला 7 कोटी, ग्रेड A साठी 5 कोटी , ग्रेड B मधील खेळाडूला 3 आणि ग्रेड Cमधील खेळाडूला 1 कोटी पगार दिला जातो. त्यांनी वर्षाला कितीही सामने खेळले तरी त्यांना हा पगार मिळतोच. करारबद्ध खेळाडू वर्षाला एकही सामना खेळला नाही तरी त्याला तो पगार मिळणार. पण, बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा ब्रँड्समधून भारतीय क्रिकेटपटू अधिक रक्कम कमावतात...
शिखर धवन ( Shikhar Dhawan – 5.2 crores ) - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणाऱ्या काही मोजक्या क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून शिखर धवन ओळखला जातो. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेत्या संघाचा तो सदस्य होता आणि त्या स्पर्धेत त्यानं त्याची छाप पाडली होती. त्यानंतर तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत त्याच्या जोडीनं भारताला अनेकदा आक्रमक सुरूवात करून दिली आहे. आता त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. बीसीसीआयच्या करारानुसार शिखर धवनला वर्षाला 5 कोटी इतका पगार मिळतो. तो GS Caltex, boAt आणि Alcis Sports या ब्रँड्ससोबत काम करतो आणि त्यासाठी त्याला 5.2 कोटी इतकी रक्कम मिळते. धवननं नुकताच DaOne हा स्वतःचा होम डेकोर ब्रँड लाँच केला आहे.
रोहित शर्मा ( Rohit Sharma – 7.2 crores ) - भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा यानं तीनही फॉरमॅटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं धमाकेदार कामगिरी केली होती. बीसीसीआयनं त्याचा समावेश ग्रेड ए+ खेळाडूंमध्ये केला आहे आणि त्याला 7 कोटी इतका पगार मिळतो. पण, रोहित 7.2 कोटी हे ब्रँड्स जाहीरातीतून मिळवतो. त्यानं Adidas, Hublot आणि Aristocrat Bags आदी कंपनींसोबत करार केला आहे.
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya – 14 crores) - ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या हार्दिक पांड्यानं ब्रँड्समधून कमाईच्या बाबतीत रोहितलाही मागे टाकले आहे. Gillette, Gulf Oil आणि Oppo mobiles या कंपनींसोबत तो काम करतो आणि त्याची ब्रँड्समधून कमाई ही 14 कोटी इतकी आहे. बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याला 3 कोटी पगार मिळतो.
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni – 120 crores) - भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार असलेला धोनी ब्रँड्समधून 120 कोटी कमावतो.
विराट कोहली ( Virat Kohli – 146 crores) - विराट कोहली हा ब्रँड्समधून कमाईच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहे. बीसीसीआयकडून त्याला 7 कोटी पगार मिळतो आणि त्याची ब्रँड्समधून कमाई ही 146 कोटी इतकी आहे. Puma, MRF Tyres आणि Audi या मोठ्या कंपनींसोबत त्याचा करार आहे.
Web Title: Indian cricketers earn more from brands than BCCI's salary, Hardik Panda earns twice as much as Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.