Join us  

IND vs AUS: एकदिवसीय मालिकेदरम्यानच टीम इंडियाच्या या दिग्गज क्रेकेटरनं दिले निवृत्तीचे संकेत, चाहते थक्क!

या व्हिडिओवरून या दिग्गज क्रिकेटरचे आंतरराष्ट्रीय करिअर अखेरच्या टप्प्यात दिसत आहे. या क्रिकेटरने आता क्रिकेट सोडून फिल्मी दुनियेत करिअर बनविण्याचा निर्मय घेतल्याचे दिसत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 7:07 PM

Open in App

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. यातच, एका स्टार क्रिकेटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवरून या दिग्गज क्रिकेटरचे आंतरराष्ट्रीय करिअर अखेरच्या टप्प्यात दिसत आहे. या क्रिकेटरने आता क्रिकेट सोडून फिल्मी दुनियेत करिअर बनविण्याचा निर्मय घेतल्याचे दिसत आहे.  चित्रपट सृष्टीत पाय रोवण्याची तयारी? -ज्या खेळाडूसंदर्भात आम्ही बोलत आहोत, तो दुसरा तिसरा कुणी नसून शिखर धवन आहे. धवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आता त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे. तो शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या माध्यमाने त्याने आपल्या चाहत्यांना, तो चित्रपट सृष्टीत पाय रोवण्याच्या तयारीत असल्याचे अपडेटही दिली आहे.

यापूर्वीही धवन चित्रपटात दिसला आहे - यापूर्वी धवन बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत 'डबल एक्सएल' चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटात त्याने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. एवढेच नाही, तर या चित्रपटात तो डान्स करतानाही दिसला होता. मात्र आता त्याच्या या इन्स्टा-व्हिडिओवरून, क्रिकेट सोडनंतर तो चित्रपट सृष्टीत पाय ठेवण्याच्या तयारीत असल्याचे वाटत आहे. धवनच्या या व्हिडिओवर लोक कमेंट करत, आता क्रिकेट सोडून चित्रपट सृष्टीत दिसणार का? अशी विचारणाही चाहते करताना दिसत आहेत.

जबरदस्त आहे करिअर -धवनच्या इंटरनॅशनल करिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास,त्या आतापर्यंत 34 टेस्ट, 167 वनडे आणि 68 टी-20 इंटरनॅशनल सामने खेळे आहेत. त्याने टेस्टमध्ये 7 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 2315 धावा ठोकल्या आहेत. वन डेचा विचार करता त्याने वन डेमध्ये 17 शतके आणि 39 अर्धशतके ठोकत 6793 धावा केल्या आहेत. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 11 अर्धशतकांच्या मदतीने 1759 घावा ठोकल्या आहेत.

टॅग्स :शिखर धवनभारतीय क्रिकेट संघसिनेमा
Open in App