T20 World Cup : India vs Pakistan Playing XI - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेत या दोघांची उणीव प्रकर्षाने जाणवली. १६ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता सामन्यांना सुरुवात होईल आणि २३ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्या मुख्य स्पर्धेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल यावरून आताच चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने India vs Pakistan लढतीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्याने त्याच्या ११ खेळाडूंमधून रिषभ पंतला ( Rishabh Pant) वगळले गेले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) सोमवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. रिषभ पंत व दिनेश कार्तिक या दोन यष्टिरक्षक-फलंदाजांची निवड करण्यात आली. पण, अंतिम ११ मध्ये या दोघांपैकी कोणाला जागा मिळेल, याची उत्सुकता आहेच. रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या हे टॉप फाईव्ह फलंदाज संघात असतीलच... गोलंदाजी विभागात जसप्रीत, हर्षल व भुवनेश्वर कुमार यांचे स्थान निश्चित आहे. उर्वरित तीन जागांसाठी फिरकीपटू व यष्टिरक्षक अशी निवड करायची आहे.
इरफान पठाणनने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषभच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिक याला पसंती दिली आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत पठाणने ही प्लेइंग इलेव्हन जाहीर केला. तो म्हणाला, पहिल्या सामन्यात एक फिरकीपटूसह अनुभवी गोलंदाज संघात हवा. त्यामुळेच माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहल आहे. माझी प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार, दीपक हुडा, हार्दिक, कार्तिक, युजवेंद्र, जसप्रीत आणि हर्षल अशी असेल. तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार याची निवड केली जाईल.''
इरफान पठाणची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल/अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमार
Web Title: Indian Ex All Rounder Irfan Pathan Suggests India Playing XI For T20 World Cup Opener Against Pakistan, Omits Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.