Virat Kohli : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटरने सैरसपाटा, Video

Virat Kohli and Anushka Sharma riding scooter -  भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक स्पर्धेसाठी कसून मेहनत घेतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 08:00 PM2022-08-20T20:00:22+5:302022-08-20T20:01:33+5:30

whatsapp join usJoin us
Indian ex captain Virat Kohli and bollywood actress Anushka Sharma riding scooter in Mumbai rode after a ad photoshoot, Video | Virat Kohli : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटरने सैरसपाटा, Video

Virat Kohli : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा मुंबईच्या रस्त्यांवर स्कूटरने सैरसपाटा, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli and Anushka Sharma riding scooter -  भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक स्पर्धेसाठी कसून मेहनत घेतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तो २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या Asia Cup 2022 स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे आणि २८ तारखेला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी  पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्रांतीच्या काळात विराटने पत्नी अनुष्का शर्मा व मुलगी वामिका यांच्यासोबत पॅरिस, लंडनमध्ये भटकंती केली. सध्या विराट मुंबईत आहे आणि तो भारतीय संघासोबत २३ ऑगस्टला यूएईसाठी रवाना होईल.

पण, विराट शुक्रवारी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. विराट व अनुष्का सोबत एका फोटोशूटसाठी गेले होते आणि तिथून चक्क या जोडप्याने स्कूटरवरून मुंबईच्या रस्त्यांवर सैरसपाटा मारल्याचा व्हिडीओ  व्हायरल झाला आहे. 




सर्व प्रियजन जवळ असूनही एकटं पडल्यासारखं वाटत होतं - विराट कोहली  
एका मालिकेनंतर पुढील मालिकेसाठी कशी तयारी करतो, या प्रश्नावर विराट म्हणाला, मी माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतो आणि जे आवडतं तेच करतो. तणाव कमी करण्यासाठी अनेकदा फिरायला जातो.  फिटनेससाठी आग्रही असलेला विराट कधीच वर्कआऊट मिस करत नाही. ''वर्कआऊट मला पुढे चालत राहण्यासाठी मदत करतं. त्यामुळेच मी कधी वर्कआऊट मिस करत नाही. त्याने मला लक्ष्य केंद्रीत करण्यास खूप मदत मिळते. यातून मला रोज नवनवीन आव्हानं मिळतात,''असे त्याने सांगितले.  

तो पुढे म्हणाला, एक खेळाडू म्हणून तुम्हाला सर्वोत्तम द्यायला लागतं. पण, अनेकदा एवढं दडपण असतं की ज्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. हा खूप गंभीर विषय आहे आणि प्रत्येकवेळी तुम्ही कणखर राहू शकत नाही. मला अनेकदा असा अनुभव आला आहे. एका खोलीत प्रियजन असूनही मला एकटं पडल्यासारखं वाटलं होतं. असं अनेकांच्या बाबतित घडतं. त्यामुळेच स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आयुष्यात समतोल राखणे गरजेचा आहे. 

Web Title: Indian ex captain Virat Kohli and bollywood actress Anushka Sharma riding scooter in Mumbai rode after a ad photoshoot, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.