Virat Kohli and Anushka Sharma riding scooter - भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक स्पर्धेसाठी कसून मेहनत घेतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तो २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या Asia Cup 2022 स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे आणि २८ तारखेला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्रांतीच्या काळात विराटने पत्नी अनुष्का शर्मा व मुलगी वामिका यांच्यासोबत पॅरिस, लंडनमध्ये भटकंती केली. सध्या विराट मुंबईत आहे आणि तो भारतीय संघासोबत २३ ऑगस्टला यूएईसाठी रवाना होईल.
पण, विराट शुक्रवारी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. विराट व अनुष्का सोबत एका फोटोशूटसाठी गेले होते आणि तिथून चक्क या जोडप्याने स्कूटरवरून मुंबईच्या रस्त्यांवर सैरसपाटा मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तो पुढे म्हणाला, एक खेळाडू म्हणून तुम्हाला सर्वोत्तम द्यायला लागतं. पण, अनेकदा एवढं दडपण असतं की ज्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. हा खूप गंभीर विषय आहे आणि प्रत्येकवेळी तुम्ही कणखर राहू शकत नाही. मला अनेकदा असा अनुभव आला आहे. एका खोलीत प्रियजन असूनही मला एकटं पडल्यासारखं वाटलं होतं. असं अनेकांच्या बाबतित घडतं. त्यामुळेच स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आयुष्यात समतोल राखणे गरजेचा आहे.