IND vs ENG Test: भारताने दुसरा सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला. पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत भारताने १०६ धावांनी मोठा विजय मिळवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी केली. त्याच्या ९ बळींच्या जोरावर टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. चमकदार कामगिरीमुळे बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
बुमराहला विश्रांती सिराजला संधी?
दरम्यान, तिसऱ्या सामन्यातून बुमराहला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन मोहम्मद सिराजला संधी देण्याच्या विचारात भारतीय संघ व्यवस्थापन आहे. विशाखापट्टणम कसोटीत भारताने विजयाची नोंद करत मालिकेत बरोबरी साधली आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या डावात २९२ धावांत सर्वबाद झाला. यासह टीम इंडियाने १०६ धावांनी विजय मिळवला. विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आनंद व्यक्त केला. रोहितने भारताच्या युवा शिलेदारांचे कौतुक केले. विशेषतः यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळीला हिटमॅनने दाद दिली.
जसप्रीत बुमराह भारताच्या विजयाचा हिरो
दुसरा कसोटी सामना जिंकून यजमान भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी धावांचा डोंगर उभारला. याला प्रत्युत्तर देताना इंग्लिश संघ आपल्या पहिल्या डावात २५५ धावा करू शकला. भारताने दुसऱ्या डावात २५३ धावा करून मजबूत आघाडी घेतली. पाहुण्या इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांची आवश्यकता होती. पण, इंग्लिश संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या २९२ धावांवर गारद झाला अन् भारताने १०६ धावांनी मोठा विजय मिळवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ९ बळी घेतले. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेण्यात बुमराहला यश आले.
Web Title: indian fast bowler Jasprit Bumrah might be rested for the Rajkot Test against England, and Mohammed Siraj is expected to return for the third Test, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.