टीम इंडियाचा स्टार खेळाडू शार्दुल ठाकुर याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या शिलेदारांपैकीच एक शार्दुल होता. ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यानंतर त्याच्या फॅन्सनं त्याचं जोरदार स्वागत केलं. इतकंच काय तर सेल्फी त्याची एक झलक पाहण्यासाठीही फॅन्स आतुर झाले होते. परंतु एक किस्सा असाही आहे, तीन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतलेल्या शार्दुलला कोणी ओळखलंही नव्हतं.२०१८ मध्ये शार्दुलसोबत असा प्रसंग घडला होता जेव्हा शार्दुल दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत पोहोचला होता. शार्दुलनं आपल्या घरी पालघरला जाण्यासाठी मुंबईतील अंधेरी स्थानकातून ट्रेन पकडली होती. तो ज्या डब्यात प्रवास करत होता त्या डब्यात अनेक प्रवासी होते. परंतु त्यावेळी त्याला कोणीच ओळखलं नव्हतं. "दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर मी घरी जाण्यासाठी अंधेरीहून ट्रेन पकडली होती. मी हेडफोन्सही लावले होते आणि मला लवकर घरी पोहोचायचं होतं. जे लोकं मला ट्रेनमध्ये पाहत होते ते खरंच संभ्रमात होते की हा शार्दुल ठाकुर आहे का नाही," असं शार्दुलनंच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- एकेकाळी लोकल ट्रेनमध्येही कोणी ओळखलं नव्हतं... पण आता ही मराठमोळी व्यक्ती आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू
एकेकाळी लोकल ट्रेनमध्येही कोणी ओळखलं नव्हतं... पण आता ही मराठमोळी व्यक्ती आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू
माहितीये का म्हणतात या खेळाडूला 'पालघर एक्स्प्रेस'?
By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 10:39 AM
ठळक मुद्देशार्दुल पालघर एक्स्प्रेस म्हणून सर्वांच्या परिचयाच्या आहेशार्दुल आज टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे