Virat Kohli Double Century: विराटच्या शतकाची चाहत्यांना होती प्रतीक्षा; किंग कोहलीने मात्र Instagram वर ठोकली 'डबल सेंचुरी'

असा पराक्रम करणारा विराट एकमेव भारतीय सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 04:12 PM2022-06-08T16:12:01+5:302022-06-08T16:12:53+5:30

whatsapp join usJoin us
Indian former Captain Virat Kohli becomes first Indian with 200 million followers on Instagram | Virat Kohli Double Century: विराटच्या शतकाची चाहत्यांना होती प्रतीक्षा; किंग कोहलीने मात्र Instagram वर ठोकली 'डबल सेंचुरी'

Virat Kohli Double Century: विराटच्या शतकाची चाहत्यांना होती प्रतीक्षा; किंग कोहलीने मात्र Instagram वर ठोकली 'डबल सेंचुरी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Double Century: भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक पराक्रम केले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील रनमशिन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. पण विराटने जेवढे विक्रम आपल्या बॅटने केले आहेत, तेवढेच विक्रम तो सोशल मीडियावरही करताना दिसतो. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून जवळपास दोन ते अडीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या शतकाची प्रतीक्षा आहे. पण याच दरम्यान विराट कोहलीने मात्र इन्स्टाग्रामवर डबल सेंचुरी म्हणजेच द्विशतक करण्याचा नवा विक्रम केला.

फलंदाजीत मोठे विक्रम करणाऱ्या विराटने इन्स्टाग्रामवर एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. इन्स्टाग्रामवर २० कोटी फॉलोअर्स असलेला विराट पहिला भारतीय ठरला. या स्पर्धेत विराटच्या जवळ एकही भारतीय नाही. एवढेच नाही तर गेल्या वर्षी १०० मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा विराट पहिला भारतीय ठरला होता. विराटने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.

इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत विराट कोहलीने जगातील मोठ्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. पण तरीही जगात असे चार लोक आहेत जे विराटच्या पुढे आहेत. विराटच्या पुढे फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (४५१ मिलियन), कायली जेनर (३४५ मिलियन), सेलेना गोम्झ (३२५ मिलियन) आणि ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉक (३२० मिलियन) हे लोक आहेत.

Web Title: Indian former Captain Virat Kohli becomes first Indian with 200 million followers on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.