नवी दिल्ली : आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. पण, या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारताला मोठा झटका बसला आहे. कारण वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतीमुळे वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबतची माहिती दिली असून सिराज लवकरच मायदेशात परतणार आहे.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिराजने मालिकेतून माघार घेतली आहे. भारतीय खेळाडूने पायाच्या दुखापतीची तक्रार केली असता खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वन डे मालिकेचे वेळापत्रक
- पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस (सायंकाळी ७ वाजल्यापासून)
- दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस (सायंकाळी ७ वाजल्यापासून)
- तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद (सायंकाळी ७ वाजल्यापासून)