वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं म्हणजे पुरे झालं, पण... ; शिखर धवनच्या विधानानं चाहत्यांमध्ये संभ्रम

भारतीय खेळाडू शिखर धवनने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याबद्दल केलेले विधान चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:08 PM2023-08-08T17:08:12+5:302023-08-08T17:23:41+5:30

whatsapp join usJoin us
Indian player Shikhar Dhawan has made a big statement about the World Cup match between India and Pakistan  | वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं म्हणजे पुरे झालं, पण... ; शिखर धवनच्या विधानानं चाहत्यांमध्ये संभ्रम

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं म्हणजे पुरे झालं, पण... ; शिखर धवनच्या विधानानं चाहत्यांमध्ये संभ्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय खेळाडू शिखर धवनने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याबद्दल केलेले विधान चर्चेत आहे. सोशल मीडियावर धवनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणतो की, पाकिस्तानविरूद्धचा सामना भारताने कोणत्याही परिस्थितीत जिंकायला हवा. स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडीओत, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीबद्दल धवन बोलत आहे. "विश्वचषक जिंका किंवा नका जिंकू पण पाकिस्तानला हरवायचंच", हे समीकरण सुरूवातीपासूनचे असल्याचे धवन म्हणतो.

पण, विश्वचषक जिंकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि देवाच्या आशीर्वादाने मला आशा आहे की, आपण नक्कीच किताब जिंकू. निश्चितच पाकिस्तानविरूद्ध खेळताना उत्साह शिगेला असतो. पण, दबाव देखील खूप असतो. जेव्हा जेव्हा मी पाकिस्तानविरूद्ध सामने खेळलो आहे, जास्त वेळा आम्ही विजय संपादन केला, असेही धवनने सांगितले. 

व्हिडीओ डिलीट पण...
खरं तर स्टार स्पोर्ट्सने तो व्हिडीओ त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटवला आहे. धवनच्या या विधानाचा दाखला देत चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानविरूद्ध धवनने नेहमीच शानदार खेळी केली आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबर रोजी आमनेसामने असणार आहेत. 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल

 

Web Title: Indian player Shikhar Dhawan has made a big statement about the World Cup match between India and Pakistan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.