शिखर धवनवर अन्याय सुरूच! रवी शास्त्रींनी मांडलं परखड मत; सांगितला जुना किस्सा

भारतीय सलामीवीर शिखर धवन मागील मोठ्या कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:30 PM2023-08-18T13:30:48+5:302023-08-18T13:31:13+5:30

whatsapp join usJoin us
 Indian player Shikhar Dhawan is not being given what he deserves, says former Team India head coach Ravi Shastri  | शिखर धवनवर अन्याय सुरूच! रवी शास्त्रींनी मांडलं परखड मत; सांगितला जुना किस्सा

शिखर धवनवर अन्याय सुरूच! रवी शास्त्रींनी मांडलं परखड मत; सांगितला जुना किस्सा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर असलेला गब्बर अर्थात शिखर धवनआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा कधी सक्रिय होणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. अनेक नामांकित सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी मॅचविनरची भूमिका बजावणाऱ्या धवनसाठी आता रवी शास्त्रींनी बॅटिंग केल्याचे दिसते. धवनवर अन्याय होत असल्याचे सांगत भारताच्या माजी प्रशिक्षकांनी भारतीय खेळाडूच्या समर्थनाचं 'शिखर' गाठलं. 

शिखर धवनने अलीकडेच एक विधान करून आपला इरादा स्पष्ट केला होता. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करण्यासाठी स्वत:ला तंदुरूस्त ठेवत असल्याचे त्यानं सांगितलं. खरं तर शिखर धवनला आशिया चषकापूर्वीच्या एकाही मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आयर्लंड दौऱ्यातून देखील त्याला वगळण्यात आलं. अशातच भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सलामीवीर फलंदाजाबाबत मोठे विधान केलं आहं.

रवी शास्त्रींचं परखड मत
रवी शास्त्रींनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "भारतीय सलामीवीर शिखर धवन ज्यासाठी पात्र आहे ते त्याला दिलं जात नाही. धवन हा एक उत्तम खेळाडू आहे. जेव्हा २०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तेव्हा टीम इंडिया गब्बरची कमी अनुभवत होती", असं शास्त्रींनी सांगितलं. 

दरम्यान, २०१९ च्या विश्वचषकात शिखर धवन भारतीय संघाचा हिस्सा होता. स्पर्धेच्या सुरूवातीला गब्बरला दुखापत झाली होती, ज्यानंतर त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यामुळे डावखुरा फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये असणं कोणत्याही संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरतं, असं शास्त्री म्हणतात. याआधी देखील भारताचा सलामीवीर शिखर धवन पुनरागमन करणार असल्याची चर्चा अनेकदा झाली आहे.

Web Title:  Indian player Shikhar Dhawan is not being given what he deserves, says former Team India head coach Ravi Shastri 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.