Join us  

महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा सन्मान, ICCच्या वन डे अन् ट्वेंटी-20 संघात मिळालं मानाचं स्थान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी 2019मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंची निवड केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:52 PM

Open in App
ठळक मुद्देसर्वोत्तम महिला खेळाडू - एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया)सर्वोत्तम वन डे खेळाडू - एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया)सर्वोत्तम ट्वेंटी-20 खेळाडू - अ‍ॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी 2019मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंची निवड केली. ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरी आणि अ‍ॅलिसा हीली यांनी अनुक्रमे वर्षातील वन डे आणि ट्वेंटी-20तील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला. आयसीसीनं 2019चा वन डे व ट्वेंटी-20 संघाचं नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगकडे सोपवण्यात आला आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या या संघात भारताच्या स्मृती मानधनासह सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण, स्मृतीला विशेष सन्मान देण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिसा पेरीनं 2019च्या महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासह वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचाही मान पटकावला. पेरीनं या वर्षात सर्व फॉरमॅटमध्ये मिळून तीन शतक झळकावली. तीनं 12 वन डे सामन्यांत 73.50च्या सरासरीनं धावा केल्या आणि 21 विकेस्टही घेतल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटपटूचा मानही तिनं पटकावला.

ऑस्ट्रेलियाच्या हिलीनं ट्वेंटी-20तील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान सलग दुसऱ्यांदा नावावर केला. तिनं ऑक्टोबरमध्ये विक्रमी  खेळी करताना श्रीलंकेविरुद्ध 61 चेंडूंत नाबाद 148 धावा केल्या होत्या. तिनं 25 चेंडूंत अर्धशतक केले आणि त्यानंतर 46 चेंडूंत शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष किंवा महिला फलंदाजांत ट्वेंटी-20तील हे सर्वात जलद शतक ठरले.  

महाराष्ट्राच्या स्मृतीनंही हे वर्ष गाजवलं. तिनं वन डे क्रिकेटमध्ये 7 सामन्यांत 70.50च्या सरासरीनं 423 धावा चोपल्या. त्यात एक शतक व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20तही तिनं 14 सामन्यांत 31.15च्या सरीसरीनं चार अर्धशतकांसह 405 धावा चोपल्या. त्यामुळे तिचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला आहे.  

पुरस्कार विजेते खेळाडू.सर्वोत्तम महिला खेळाडू - एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया)सर्वोत्तम वन डे खेळाडू - एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया)सर्वोत्तम ट्वेंटी-20 खेळाडू - अ‍ॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया) उदयोन्मुख खेळाडू - चनिदा सथिरूंग ( थायलंड) 

2019चे संघ: 

वन डे संघ  - अ‍ॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना ( भारत), तम्सीन बीयूमोंट ( इंग्लंड), मेग लॅनिंग, कर्णधार ( ऑस्ट्रेलिया), स्टेफनी टेलर ( वेस्ट इंडिज), एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया), जेस जोनासेन ( ऑस्ट्रेलिया, शिखा पांडे ( भारत), झुलन गोस्वामी ( भारत), मीगन स्कट ( ऑस्ट्रेलिया), पूनम यादव ( भारत).  

ट्वेंटी-20 संघ - अ‍ॅलिसा हिली ( ऑस्ट्रेलिया), डॅनिएल वॅट ( इंग्लंड), मेग लॅनिंग, कर्णधार ( ऑस्ट्रेलिया), स्मृती मानधना ( भारत), लिझली ली ( दक्षिण आफ्रिका), एलिसा पेरी ( ऑस्ट्रेलिया), दीप्ती शर्मा ( भारत), निदा दार ( पाकिस्तान), मीगन स्कट ( ऑस्ट्रेलिया), शबनीम इस्मैल ( दक्षिण आफ्रिका), राधा यादव ( भारत).

टॅग्स :आयसीसीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघ