समुद्रकिनारी भारतीय खेळाडू करत आहेत कसला सराव, पाहा हा व्हिडीओ

भारतीय खेळाडूंनाही या समुद्र किनाऱ्यांवर फिरण्याचा मोह आवरता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 09:49 PM2019-08-13T21:49:31+5:302019-08-13T21:50:42+5:30

whatsapp join usJoin us
Indian players are practicing at the beach, watch this video | समुद्रकिनारी भारतीय खेळाडू करत आहेत कसला सराव, पाहा हा व्हिडीओ

समुद्रकिनारी भारतीय खेळाडू करत आहेत कसला सराव, पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज हा निसर्ग संपन्न देश आहे. वेस्ट इंडिजमध्ये चांगले समुद्र किनारे पाहायला मिळतात. भारतीय खेळाडूंनाही या समुद्र किनाऱ्यांवर फिरण्याचा मोह आवरता आला नाही. पण यावेळी भारताच्या खेळाडूंनी या समुद्र किनाऱ्यावर सराव केला आणि त्यावेळी आपल्या देशाचा एक माजी क्रिकेटपटूही पाहायला मिळाला.

भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे येथील एका समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळाले. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर हे दोघे पाण्यात जाऊन मजा-मस्ती करत असतील, असे तुम्हाला वाटत असेल. पण तसे पाहायला मिळाले नाही. या दोघांनी समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये चक्क स्टम्प लावले आणि त्यांनी रन आऊट करण्याचा सराव केला. यावेळी त्यांना भेटला भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ.

हा पाहा व्हिडीओ

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धवनकडून मोठ्या खेळीची आशा
भारताचा सलामीवीर शिखर धवन विश्वचषकात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे उर्वरीत विश्वचषक त्याला खेळता आला नव्हता. पण आता पूर्णपणे फिट झाल्यावर धवन भारतीय संघात आला आहे. पण संघात पुनरागमन केल्यापासून धवनला अजूनही सूर गवसलेला नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धवनकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलमीवीर शिखर धवनने शतक झळकावले होते. पण या शतकानंतर मात्र तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे धवनला विश्वचषकाला मुकावे लागले होते. पण आता धवन दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान दिले आहे. पण त्याचा खेळ पाहून त्याची बॅट जायबंदी झाली आहे का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिन्ही ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये धवन खेळला. या तिन्ही सामन्यांत धवनला अनुक्रमे 1, 23 आणि 3 धावा केल्या होत्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला फलंदाजी करायला मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यात धवनला फक्त 2 धावाच करता आल्या. त्यामुळे गेल्या चार सामन्यांमध्ये धवनला एकही चांगली खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे धवनच्या बॅटला गंज चढला का, असा सवाल चाहते विचारत आहेत.

वेस्ट इंडिजमध्ये भारतीय खेळाडूंची धमाल-मस्ती; पाहा खास व्हिडीओ
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी दमदार होत आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये सलामीवीर शिखर धवन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. 

भारताचे हे खेळाडू एका नदीकाठी मजा करताना दिसत आहेत. नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उड्या मारत त्यांची मस्ती चालू आहे. त्याचबरोबर नदीमध्ये ते स्विमिंग करतानाही दिसत आहे. धवनने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर पोस्ट केला आहे.

Web Title: Indian players are practicing at the beach, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.